शेख मुहम्मद अबिस ने मारले रमज़ान चे मैदान !अवघ्या आठव्या वर्षी पूर्ण केले महिनाभराचे रोज़े; पंचक्रोशीत होत आहे कौतुक
बीड (एस.एम.न्युज़) - येथील आसेफ़ नगर भागातील रहिवाशी प्रा.डॉ. शेख अब्दुल जब्बार सर यांचा मुलगा आणि एआयएमआयएम चे नेते तथा उद्योगपती शेख निज़ाम, नगरसेवक शेख अमर आणि समाजसेवक शेख अकबर यांचा भाचा शेख मुहम्मद अबिस याने यंदा वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी रमज़ान महिन्याचे संपूर्ण ३० रोज़े पुर्ण करून मैदान मारल्याने त्याचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
यावर्षी तप्त उन्हाळ्यात इस्लाम धर्माचा पवित्र रमज़ान महिना सुरु झाला होता. महिन्यातील पूर्ण ३० दिवसांमधील दोन-चार दिवस जिल्ह्यातील काही भागात पडलेल्या अवकाळी पावसामुळे काही भागात गारवा आणि ढगाळ वातावरणाचा अपवाद वगळता उन्हाळ्याचे तप्त वातावरण, आग ओकणारे ऊन, घामटा काढणाऱ्या दमट वातावरणामुळे अंगातून निघणाऱ्या घामाने होणारी जीवाची लाहीलाही सहन करून वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी रमज़ान महिन्याचे संपूर्ण ३० रोज़े पूर्ण करणे निश्चितच सोपे नव्हते. परंतु इस्लाम धर्मात असलेल्या पाच फर्ज़ पैकी एक असलेले रमज़ान महिन्याच्या रोज़ा चे फर्ज़ मुहम्मद अबिस ने दृढ इच्छाशक्तीच्या बळावर पूर्ण केले. यामुळे त्याचे पंचक्रोशीत कौतुक होत असून त्याचे अभिनंदन होत आहे. रमज़ान ईद च्या पूर्वसंध्येला समस्त आसेफ़नगरवासियांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी त्याचे आजी-आजोबा, आई-वडील, तात्या-काकू, सर्व मामा-मामी, भाऊ ज़ोएब आणि ताबिश यांनी सर्वांच्या शुभेच्छांच्या वर्षावाचे आभार मानले.
-------------------------
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक- एस.एम.न्युज़,
आसेफ़ नगर,बीड़.
संपर्क- 9021 02 3121
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा