आत्या-पुतण्या चा जिवनातील पहिला रोज़ा पुर्ण
बीड (एस.एम.न्युज़)- आठ वर्षाची हफ़िज़ा (अक्सा) आणि साढे पाच वर्षाच्या अरहान ने आपआपल्या जिवनातील पहिला रोज़ा पुर्ण केल्याने त्यांची विशेष चर्चा होत आहे.
आजपर्यंत आपण भाऊ-भाऊ, बहिण-बहिण, भाऊ-बहिण आपआपल्या जिवनातील पहिला रोज़ा ठेवून पुर्ण केल्याचे अनेकदा पाहिले आहे. तसेच प्रसिद्धी माध्यमातून वाचले आहे. परंतु यावेळी मात्र बहुधा प्रथमच आत्या आणि पुतण्याने जिवनातील पहिला रोज़ा पुर्ण केला आहे. आत्या असलेली मोमीन हफ़िज़ा मुहम्मद नवाज़ (शब्बीर) आणि पुतण्या असलेला मोमीन अरहान नुरोद्दीन या दोघांनी आपल्या जिवनातील पहिला रोज़ा सध्या सुरू असलेल्या पवित्र रमज़ान महिन्यात पुर्ण केल्याने या दोघांची विशेष चर्चा होत आहे. तसेच अनेकांकडून अभिनंदन होत आहे. या दोघांनाही आजी-आजोबा, आई-वडील, काका-काकू, मामा-मामी, बहिण-भाऊ आदींनी शुभेच्छा देऊन कौतुक केले आहे.
--------------------------
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक -एस.एम.न्युज़,
बीड
संपर्क - 9021 02 1321.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा