Breaking News

प्रभाग क्रमांक १८ व १९ मध्ये नालेसफाई, स्वच्छता व औषध फवारणी करावी; सुफियान मनियार व इम्रान शहा यांनी केली मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी

सुफियान मनियार व इम्रान शहा यांनी केली मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी
बीड(एस.एम.न्युज़)- बीड नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक १८-१९ इस्लामपुरा, गांधीनगर, अख्तर नगर, राजु बेकरी चौक, शहा काॅलोनी, नुर काॅलोनी,दिलावर नगर , अमन कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे, जागोजागी रस्त्यावर कचरा पडलेला आहे, नालेसफाई न झाल्याने नाल्या तुंबलेले आहे जेणेकरून नाल्याचे पाणी रस्त्यावर येत असून नागरिकांना रहदारीसाठी कसरत करावी लागते. कचऱ्या व घाणीचे मुळे डासांचे प्रमाण वाढले असून नागरीकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालेला आहे. काही दिवसात मुस्लिम समाजाचा सर्वात मोठा सण रमजान ईद येत आहे सणासुदीच्या काळात कचरा,घाणी व डासांमुळे नागरीक आजारी पडत आहे. 
          रमजान ईदच्या पुर्वी लवकरात लवकर प्रभाग क्रमांक १८ व १९ मध्ये नालेसफाई, स्वच्छता करून औषध फवारणी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुफियान मनियार व इम्रान शहा यांनी मुख्याधिकारी नगरपालिका बीड यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. 
यावेळी, मुहम्मद पठाण, सय्यद सिराज, इम्रान शेख, फुरकान मनियार, नदीम पठाण, शेख बशीर, सय्यद सद्दाम व इतर उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत