आसेफ़नगर मध्ये डासांचा उच्छाद,नाल्या काढा;धूर फवारणी साठी रिक्षा ऐवजी कर्मचारी पाठवा - एस.एम.युसूफ़
बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील आसेफ़नगर भागात गेल्या अनेक दिवसांपासून डासांचा उच्छाद वाढल्याने येथील नागरिकांना रात्रीची झोप घेणे अवघड झाले आहे. बीड नगरपरिषदेने डासांची पैदास होत असलेल्या नाल्या काढून औषध फवारणी व घराघरांत धूर फवारणी करण्यासाठी रिक्षा ऐवजी कर्मचारी पाठवावे. अशी मागणी केली आहे.
याविषयी सविस्तर असे की, आसेफ़ नगर येथील अकबर किराणा दुकान गल्ली मध्ये नाल्या काढून एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. येथील नाल्या तुडूंब भरून तुंबल्याने त्यात मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होत आहे. यामुळे येथील नागरिकांना रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर तगमग करत रात्र काढावी लागत आहे. म्हणून नागरिकांना डोकेदुखी, डोळेदुखी चा त्रास होत आहे. शिवाय डास रात्रभर सारखे चावत असल्याने नागरिकांना थंडी तापाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगोदरच कोरोनामुळे लोक बेजार झालेले आहेत. त्यात पुन्हा डासांच्या हल्ल्याने भर पडली आहे. नागरिकांची यातून सुटका करण्याकरिता येथील नाल्या काढून औषध फवारणी व घराघरात धूर फवारणी करावी. तसेच येथे गल्लीची रुंदी फार कमी असल्याने बीड नगर परिषदेचा धूर फवारणी करणारा रिक्षा गल्लीत येत नाही. यामुळे येथे बीड नगर परिषद कडून गेल्या कित्येक महिन्यांपासून धूर फवारणी करण्यात येत नाही. ही बाब लक्षात घेऊन या गल्लीत धुर फवारणी करण्याकरिता रिक्षा ऐवजी कर्मचारी पाठवावे. अशी मागणी केली आहे.
आपला
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - 9021 02 3121
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा