मायबाप सरकारने जनावरांना टाकायची बाजरी व मका रेशन दुकानांवर माणसांसाठी पाठवला!
कोरोना काळात हे धान्य खाऊन माणसांची
इम्युनिटी पॉवर वाढणार का ? - एस.एम.युसूफ़
बीड (एस.एम.न्युज़) - शासनाने रेशन दुकानांवर नेहमीच्या गहू-तांदळासह यंदा बाजरी आणि मका हे दोन धान्यही पाठवले आहे. मात्र ते कोंबड्या आणि जनावरांना खाण्यासारखे असून हे धान्य खाऊन कोरोना काळात माणसांची इम्युनिटी पॉवर वाढणार का ? असा संतप्त सवाल आपले सरकार या वेब पोर्टल द्वारे पाठवलेल्या निवेदनातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केला आहे.
याविषयी पाठविलेल्या निवेदनात नमूद केले की, गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे शासन-प्रशासनाकडून लावण्यात येणार्या लॉक डाऊन मुळे सर्वसामान्य गोरगरीब जनता आर्थिक दृष्ट्या पुरती हतबल झाली आहे. गेल्या एक वर्षाच्या काळात शासनाकडून रेशन दुकानांवर फक्त तीन महिने प्रति मानसी पाच किलो धान्य देण्यात आले याव्यतिरिक्त सर्वसामान्यांची अडचण दूर होईल, त्यांना दिलासा मिळेल असे कुठलेही कार्य रेशन दुकानामार्फत शासनाकडून करण्यात आले नाही. आता शासनाने घोषित केलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये शासनाकडून नेहमीच्या गहू-तांदळा सोबत बाजरी आणि मका रेशन दुकानांवर देण्यात आला. परंतु हि बाजरी आणि मका पाहता ती कुठल्याही माणसांना खाण्यायोग्य नाही असे दिसून येते. यापैकी बाजरी ही पाण्यात भिजलेली, काळी-पिवळी व भरपूर गोंड असलेली, दळून पीठ केल्यावर भाकर कडवट लागत असलेली आहे. याचा अनुभव घेतलेले सर्वसामान्य गोरगरीब ग्राहक, हि बाजरी कोंबड्यांना टाकायची आहे. असे म्हणू लागले आहेत. तर मका हा किडका-मिळका असल्याने रेशन कार्ड धारक तो घेण्यास नकार देत आहेत. एक तर आपल्याकडे मक्याच्या भाकरी कुणीही बनवीत नाही व खातही नाही. तरीपण जर चांगला मका आला असता तर ग्राहकांनी त्याचे निदान पॉपकार्न तरी बनवून खाल्ले असते. परंतु तो ही अत्यंत निकृष्ट असल्याने जनावरांना टाकण्यासारखाच असल्याचे मतही अनेक ग्राहक व्यक्त करीत आहेत. एकीकडे कोरोनामुळे अगोदरच आर्थिक दृष्ट्या त्रस्त झालेली जनता शासनाच्या अशा कृत्यामुळे अजून जास्त मेटाकुटीस आली आहे. सर्वसामान्य गोरगरीब माणसं नाहीत का ?कोरोना सारख्या महामारी च्या काळात शासन-प्रशासन एकीकडे सरधोपटपणे लॉक डाऊन लावून छळ करीत आहे. तर दुसरीकडे घरी कोंडून असलेल्या सर्वसामान्य गोरगरिबांना दोन वेळेस पोटाची खळगी भरण्याकरिता आवश्यक असलेले धान्य अशाप्रकारे जनावरांना खाण्यासारखे पाठविले जात असल्याने मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. लॉक डाऊन लावताना शासन-प्रशासनाकडून म्हटले जाते की, कोरोना पासून वाचण्यासाठी जनतेने आपली इम्युनिटी पॉवर वाढवावी. जेणेकरून कोरोना पासून वाचता येईल. आता दस्तुरखुद्द शासनच अशाप्रकारे निकृष्ट आणि जनावरांना टाकण्यासारखे धान्य सर्वसामान्य गोरगरिबांना खाण्यासाठी देत असेल तर ते खाऊन जनतेची इम्युनिटी पॉवर खरोखरच वाढेल का ? असा संतप्त सवाल आपले सरकार या वेब पोर्टल द्वारे पाठवलेल्या निवेदनातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केला आहे.
मुख्य संपादक
एस.एम.न्युज़, बीड.
संपर्क - 9021 02 3121
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा