Breaking News

बीड जिल्ह्यातला लॉकडाउन रद्द करा - एआयएमआयएम
पक्षश्रेष्ठी,व्यापारी संघटना,श्रमिक वर्गासोबत चर्चा करून मोर्चाची भुमिका स्पष्ट करणार - ॲड.शेख शफिक भाऊ
बीड (एस.एम.न्युज़) - गेल्या वर्षभरापासून शासन-प्रशासनाकडून लावण्यात येत असलेल्या लॉक डाऊन मुळे सर्वसामान्य गोरगरीब जनता पार मेटाकुटीस आली असून सर्वांची यातून सुटका व्हावी. आर्थिक विवंचनेतून सर्वांनी बाहेर पडावे. याकरिता आता लॉक डाऊन रद्द करा अन्यथा जनहितास्तव एआयएमआयएम पक्ष मोर्चा काढेल. असा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला असून लॉक डाऊन रद्द करण्यासोबतच विज बिल माफ करण्यात यावे, विज कनेक्शन न कापता सक्तीची वसुली बंद करण्यात यावी, कोरोना लॉक डाऊन मुळे मार्च 2020 पासून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या जनतेला आर्थिक मदत देण्यात यावी. अशा अन्य मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, 22 मार्च 2020 पासून कोरोना च्या निमित्ताने शासन-प्रशासनाकडून वेळोवेळी लॉक डाऊन लावण्यात येत आहे. याचा छोटे-छोटे व्यापारी, मोलमजुरी करणारे कामगार-श्रमिक, रिक्षाचालक, हातगाडी चालक, फळ-भाजीविक्रेते या सर्वांच्या अर्थार्जनावर विपरीत परिणाम पडला आहे. एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून लावण्यात येणाऱ्या वारंवारच्या लॉक डाऊन मुळे हे सर्वजण आर्थिक दृष्ट्या पार डबघाईस आले आहे. अशा अवस्थेमध्ये जिल्हा प्रशासनाने पुन्हा जिल्ह्यात लॉकडाऊन लावल्याने यात अजून जास्त भर पडली आहे. म्हणून जनतेची होत असलेली आर्थिक कुचंबणा दूर करण्यासाठी लावण्यात आलेले लॉक डाऊन रद्द करण्यात यावे किंवा सकाळी दहा ते संध्याकाळी सात पर्यंत  उद्योग व व्यापार सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात यावी अशी भूमिका एआयएमआयएम पक्ष सुरुवातीपासून निवेदनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून आपल्याकडे तसेच आपल्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासह अन्य मंत्र्यांकडे ही मांडत आहे. परंतु जनतेचे होत असलेले हाल दूर करण्याकरिता शासन-प्रशासन अजूनही कोणतेही ठोस कार्य करत  नसल्याने बीड जिल्ह्यात लावलेला लॉक डाऊन रद्द करण्यात यावा. अन्यथा एआयएमआयएम पक्ष जनतेचे म्हणणे मांडण्याकरिता प्रदेशाध्यक्ष इम्तियाज़ जलील, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.अब्दुल गफ़्फ़ार क़ादरी, मराठवाडा विभागीय अध्यक्ष फिरोज़ खान लाला यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पक्ष,सर्व संघटना, व्यापारी संघटना, सर्व सामान्य जनतेसोबत चर्चा करून मोर्चाची भूमिका  स्पष्ट करून सर्वांना सोबत घेत लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू.असा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष ॲड.शेख शफिक भाऊ यांच्यासह अब्दुस सलाम सेठ, हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी, शेख मतीन, मोमिन अजहर, शेख एजाज़ खन्ना भैय्या, अकबर कच्छी,सय्यद इलयास आदींची नावे व सह्या आहेत.
----------------------------------------------------
ग्राहकांनी थकित वीज बिले दोन ते तीन टप्प्यात भरावी - अधीक्षक अभियंता 
         महावितरण कंपनीला विज बिलासंदर्भात एआयएमआयएम पक्षाने तिसऱ्यांदानिवेदन देऊन निवेदनात मोर्चाचा इशारा दिला आहे. यावर बोलताना महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी म्हटले की, महावितरण कंपनी ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडणार नाही. परंतु ग्राहकांनीही थकित वीज बिले दोन ते तीन टप्प्यात का होईना भरावीत, म्हणजे त्यांनाही त्रास होणार नाही आणि थकीत बिले वसुली चालू राहिल्याने आमच्या कंपनी वरही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही.
----------------------------------------------------
बँक हप्ते व आर.टी.ओ. कार्यालयाबाबत भाऊ जिल्हाधिकाऱ्यांशी बोलले!
         
अनेक रिक्षा चालक व मालकांनी रिक्षा व ॲपे रिक्षा बँकांकडून कर्जाच्या माध्यमातून घेतले आहे. लॉक डाऊन मुळे त्यांना बँकांचे हप्ते वेळेवर भरता येत नसल्याने बँकांकडून सक्तीने वसुलीचा तगादा लावला जात असल्याचे व आरटीओ कार्यालयातील रिक्त पदे आणि गेल्या काही दिवसांपासून कार्यालयाला लावण्यात आलेल्या टाळ्याबद्दल भाऊंनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले असता बँकांशी बोलणी करून निर्देश देऊ आणि आरटीओ कार्यालयासाठी आवश्यक ते कार्य करण्यात येईल असे आश्वासन दिले.
----------------------------------------------------
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक
(एस.एम.न्युज़) बीड.
संपर्क - 9021 02 3121

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत