इम्तियाज़ भाईंची बातच न्यारी;एकटे असूनही ठरलेत भारी!
बीड जिल्ह्यात लॉक डाऊन रद्द करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार - ॲड.शेख शफीक भाऊ
बीड (एस.एम.न्युज़) - औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने घोषित केलेला लॉक डाऊन अखेर रद्द करण्यात आला असून या लॉक डाऊन विरोधात आवाज बुलंद करणारे खासदार तथा एआयएमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज़ जलील एकटे असूनही भारी ठरल्याने त्यांची बातच न्यारी असल्याचे मत व्यक्त करून पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड.शेख शफिक भाऊ यांनी दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे की, बीड जिल्ह्यात सुद्धा लॉक डाऊन रद्द करण्याकरिता लवकरच जिल्हाधिकार्यांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे.
याविषयी मत व्यक्त करताना शेख शफीक भाऊ यांनी म्हटले आहे की, औरंगाबाद जिल्हा सुरुवातीला 30 मार्च ते 8 एप्रिल व नंतर यात बदल करून 31 मार्च ते 9 एप्रिल असा दहा दिवसांसाठी लॉक डाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. गेल्या वर्षभरापासून कोरोना च्या निमित्ताने शासन-प्रशासनाकडून वारंवार लावण्यात येणाऱ्या लॉक डाऊन मुळे हातावर पोट असणारी सर्वसामान्य गोरगरीब जनता पार मेटाकुटीस आली आहे. परंतु शासन-प्रशासन जनतेच्या दैनंदिन जीवनाकडे, त्यांच्या उदरभरणाकडे लक्ष न देता फक्त कोरोनाचा बाऊ करून वारंवार लॉक डाऊन लादत आहे. याविरोधात कोणीतरी उभे राहायला हवे, कोणीतरी पुढे यायला हवे, याचा विचार करून औरंगाबाद चे खासदार इम्तियाज जलील यांनी पुढे येऊन 31 मार्च रोजी दुपारी तीन वाजता पैठण गेट ते जिल्हाधिकारी कार्यालयावर जनहितासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदांची भरती व्हावी आणि लॉक डाऊन मागे घेण्यात यावा, अशी मागणी करत मोर्चाची पुकार दिली होती. त्यांच्या या सादेला औरंगाबादकरांसह विविध पक्ष आणि संघटनांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा जाहीर केला होता. इम्तियाज जलील यांनी केलेल्या आवाहनाला चोहीकडून जबरदस्त पाठिंबा व समर्थन मिळत असल्याचे पाहून जिल्हा प्रशासनासह विभागीय आयुक्त यांनीही शासकीय-प्रशासकीय स्तरावर बोलणी करून खासदार इम्तियाज जलील यांना विश्वासात घेत जिल्हा प्रशासनाकडून लावण्यात येणारा लॉक डाऊन मागे घेत असल्याचा निर्णय 30 मार्च रोजी रात्री घेऊन 31 तारखेचा मोर्चा रद्द करण्याची विनंती केली. यामुळे खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हा प्रशासनाने लॉकडाउन रद्द केल्याने मोर्चा रद्द करीत असल्याचे नमूद करून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला लॉक डाऊन पासून वाचविले तसेच जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त केले. या सर्व घडामोडींमध्ये लोकशाही मार्गाने लोकप्रतिनिधीने पुढे येऊन कार्य करण्याचा विडा उचलला तर जनहिताचे कार्य कसे होऊ शकते हे दिसून आल्याने जनहितास्तव रस्त्यावर येऊन कार्य करणारे लोकहितवादी खासदार इम्तियाज जलील एकटे असूनही भारी ठरलेत म्हणून त्यांची बातच न्यारी ठरते असे मत एआयएमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड.शेख शफीक भाऊ यांनी व्यक्त केले असून बीड जिल्ह्यात लावलेला लॉक डाऊन सुद्धा रद्द करण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे.
----------------------------------------------------
बीड जिल्ह्यातील मंत्री व आमदार फक्त सत्तेचे लोणचे खाण्यासाठीच आहेत का?
बीड जिल्ह्यात एक मंत्री, एक खासदार, सात आमदार आणि सत्ताधारी असूनही लॉक डाऊन मुळे जनतेचे हाल. तर औरंगाबाद मध्ये फक्त एक खासदार तरी ते लॉक डाऊन मुळे होणारी जनतेची ससेहोलपट थांबविण्यास शासन-प्रशासनाला भाग पाडतात. हि बाब पाहता बीड जिल्ह्यातील सर्व राजकीय पदाधिकारी फक्त पदे उबविण्यासाठी आणि सत्तेचे लोणचे चाखण्यासाठीच आहेत की काय? असा प्रश्न आता बीडकर जनतेतून उपस्थित केला जात असल्याचे ही ॲड.शेख शफीक भाऊ यांनी म्हटले आहे.
-------------------------------------
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक (एस.एम.न्युज़)
तथा मुक्तपत्रकार
आसेफ़नगर,बीड.
संपर्क - 9021 02 3121.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा