Breaking News

मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री व आजी-माजी आमदारांचे वेतन-पेंशन जनतेसाठी द्यावे - एस.एम.युसूफ़
बीड (एस.एम.न्युज़) - येत्या २६ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत बीड जिल्ह्यात लॉक डाऊन लावण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयानंतर  मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री व आजी-माजी आमदारांचे वेतन-पेंशन जनतेसाठी द्यावे. अशी मागणी आपले सरकार या पोर्टल द्वारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार बीड जिल्ह्यात दि.२६ मार्च ते ४ एप्रिल २०२१ या कालावधीपर्यंतचे लॉक डाऊन लावण्यात आले आहे. यामुळे अनेक उद्योग धंद्यांवर परिणाम होणार असून व्यापारी,शेतकरी, कामकरी,कष्टकरी,इमारत कामगार,हातगाडे चालक,रिक्षा चालक, आदींसह आपली उपजीविका भागविणारे सर्वसामान्यजन जेरीस येणार आहेत. या सर्वांना जगण्याकरिता शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही.स्वतःहून काबाड कष्ट व मेहेनत करून आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या पोटाची खळगी भरावी लागते. लॉक डाऊन मुळे आर्थिक आवक-जावक बंद होऊन जाते.शासन चालवणाऱ्या आपल्यासह सर्व मंत्र्यांना, सर्व विद्यमानांसह माजी आमदारांना, "दिन जावो पगार आओ" प्रमाणे दरमहा भरभक्कम वेतन, पेंशन व इतर सेवासुविधा मिळतात. यामुळे आपणासह सर्व राजकारणी कुटुंबाचा प्रपंच चालवून दरमहा बँकांमध्ये सेविंग करता येते. म्हणून कोरोना च्या निमित्ताने फक्त आठ-दहा दिवसांचे नाही तर  दोन-तीन महिन्यांचे लॉक डाऊन लावायचे आदेश देवून टाका. परंतु तत्पूर्वी आपल्यासह सर्व मंत्री, आजी-माजी आमदारांचे वेतन व पेंशन सर्वसामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तू मोफत वाटप करण्याकरिता देवून टाकावे. जीवनावश्यक असलेले सर्व खाद्यपदार्थ विनासायास घरपोहोच मोफत वाटप करण्यात यावे. यातून सर्व शासकीय-प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, ज्यांच्या घरातील एकही व्यक्ती शासकीय-प्रशासकीय सेवेत नाहीत तसेच नगरसेवक,नगराध्यक्ष, जि.प.सदस्य,पं.स. सदस्य,विधानसभा व विधानपरिषद चे आजी-माजी सदस्य, लोकसभा व राज्यसभेचे आजी-माजी सदस्य यांना वगळण्यात यावे.फक्त ज्यांचे हातावर पोट आहेत अशा सर्वसामान्य जनतेला ही सर्व मदत विनामूल्य व ती ही घरपोच देण्यात यावी.यासाठी मदत धारक बी.पी.एल.कार्ड धारकच असावा अशा किचकट व भंकस अटी लादण्यात येऊ नये. आपणा सर्व लोकप्रतिनिधींचे वेतन व पेंशन मधून असे नियोजन केल्यास कितीही दिवसांचे लॉकडाऊन लावले तरी सर्वसामान्य जनतेला कोणतीही तक्रार राहणार नाही. आपले सरकार या वेब पोर्टल मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून म्हटले आहे.
 एस.एम.युसूफ़ 
मुख्य संपादक तथा 
मुक्त पत्रकार, बीड.
संपर्क - 9021 02 3121.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत