Breaking News

विश्व मानवाधिकार परिषद कडून पत्रकार एस.एम.युसूफ विशेष प्रमाणपत्राने सन्मानित
 
 बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते एस.एम.युसूफ़ हे पत्रकारितेसह करत असलेल्या सामाजिक कार्याची नोंद घेत त्यांना विश्व मानवाधिकार परिषद (लखनौ) कडून विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 
       विश्व मानवाधिकार परिषद चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.एम.आर.अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याध्यक्ष हाजी सय्यद लायक़ साहेब यांच्या हस्ते एस.एम.युसूफ़ यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मुफ़्ती जावेद हुसैनी, जाकिर सिद्दिकी, मौलाना बाकी हुस्सामी, पत्रकार भागवत तावरे, डॉ.भास्कर ढवळे, गणेश राऊत, विठ्ठल घरत, अजमेर मनियार, संपादक पठाण अय्युब खान, पत्रकार शेख रिजवान, विश्व मानवाधिकार परिषदेचे राज्य सचिव तथा पत्रकार सिराज खान आरजु, युवा सेलचे प्रदेशाध्यक्ष सय्यद सोहेल, बीड जिल्हा उपाध्यक्ष मुहम्मद फैज़ान अकबर, शायर व कवी काज़ी मुजीबुर्रहमान, निर्भीड पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख तय्यब, मौलाना सलीम अशरफी आदींची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्राबाहेरील उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यातील लखनौ  सारख्या मोठ्या शहरात असलेल्या विश्व मानवाधिकार परिषदने एस.एम.युसूफ़ यांच्या पत्रकारितेसह करत असलेल्या सामाजिक कार्याची नोंद घेत दिलेल्या विशेष प्रमाणपत्रामुळे त्यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत