वर्ल्ड ह्युमन राइट्स काउन्सिलच्या वतीने बीड येथील सामाजिक क्षेत्रातील मान्यवर कोरोना योद्धा म्हणून विशेष प्रमाणपत्राने सन्मानित

     बीड (प्रतिनिधी) वर्ल्ड ह्यूमन राइट्स काउन्सिल अर्थात विश्व मानवाधिकार परिषद महाराष्ट्र  राज्याच्या वतीने खुदाई खिदमतगार चळवळीचे संस्थापक थोर स्वतंत्रता सेनानी भारत रत्न सीमांत गांधी खान अब्दुल गफ्फार खान यांच्या जन्मदिन  जयंतीचे औचित्यसाधून बीड जिल्ह्यातील विविध क्षेत्रातून कोरोना महामारी दरम्यान  अमूल्य सेवा बजावणाऱ्या मान्यवरांना विश्व मानवाधिकार परिषदेचे राज्य अध्यक्ष हाजी सय्यद लायक यांच्या हस्ते कोरोना योद्धा पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
       याबाबत सविस्तर असे की  विश्व मानवाधिकार परिषद देश व देशाबाहेर  राष्ट्रीय अध्यक्ष डॉ एम आर अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली मानवतेच्या  विकासासाठी , समता व न्यायासाठी  कार्यरत असून  या परिषदेच्या वतीने  कोरोना महामारी दरम्यान  आपल्या जिवाची पर्वा न करता सामाजिक कार्य  करणाऱ्या  मान्यवरांना  विशेष  प्रमाणपत्र देऊन  गौरवण्यात येत आहे .परिषदेच्या वतीने कोरोना  महामारी दरम्यान अमूल्य सामाजिक सेवा विषयी बीड जिल्ह्यातून जमिअत उलेमा हिंद चे बीड जिल्हा अध्यक्ष मुफ्ती जावेद हुसैनी , जमिअत उलेमा हिंद महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मौलाना जाकिर सिद्दिकी, खिदमत ए खल्क  वेल्फेअर ट्रस्टचे  मौलाना बाकी हुस्सामी,  जिओ जिंदगी टीमचे लोकपत्रकार भागवत तावरे, डॉ  भास्कर ढवळे, गणेश राऊत, विठ्ठल घरत, अजमेर मन्यार ,खुदाई खिदमतगार महाराष्ट्र या पठाण संघटनेचे प्रदेश अध्यक्ष पठाण अय्युब खान ,प्रसिद्ध पत्रकार ग्राउंड रिपोर्ट स्पेशालिस्ट शेख रिजवान, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते एस एम युसुफ, आदी मान्यवरांना त्यांच्या अमुल्य कार्याविषयी वर्ल्ड  ह्यूमन राइट्सचा " कोरोना योद्धा " विशेष पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. सदर कार्यक्रमात यावेळी विश्व मानवाधिकार परिषदेचे राज्य सचिव सिराज खान आरजु, विश्व मानवाधिकार परिषद युवा सेलचे प्रदेशाध्यक्ष सय्यद सोहेल, बीड जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद फैजान अकबर, मौलाना आजाद विचार मंच चे बीड जिल्हा अध्यक्ष प्रसिद्ध शायर कवी काजी मुजिबुर रहमान, निर्भीड पत्रकार संघाचे  महाराष्ट्र अध्यक्ष शेख तय्यब, मौलाना सलीम अशरफी आदी मान्यवर उपस्थित होते.