वयाच्या चौऱ्याहत्तर व्या वर्षी न्यूमोनिया सह कोरोना लाही हरविलं कुटुंबीयांनी शासनासह जिल्हा रुग्णालयाचे मानले आभार!
वयाच्या चौऱ्याहत्तर व्या वर्षी न्यूमोनिया सह कोरोना लाही हरविलं
कुटुंबीयांनी शासनासह जिल्हा रुग्णालयाचे मानले आभार!
बीड (प्रतिनिधी) - शहरातील पत्रकार एस.एम.युसूफ यांच्या वडिलांनी वयाच्या चौऱ्याहत्तर व्या वर्षी न्यूमोनिया सह कोरोना लाही हरविलं आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी चांगली सेवा पुरविणारे शासन, योग्य अंमलबजावणी करणारे जिल्हा रुग्णालय, नगरसेवक, जेवण पुरविणारे अब्दुल गणी बागवान आदींचे आभार मानले.
याविषयी सविस्तर असे की, पत्रकार एस.एम.युसूफ यांचे वडील मुहम्मद अब्दुल रऊफ़ यांना न्यूमोनिया आणि कोरोना असे दोन्ही जिवघेणे आजार एकाच वेळी जडले होते. या रोगाचे निदान झाल्यावर त्यांना उपचारासाठी १८ नोव्हेंबर २०२० रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांच्यावर कक्ष क्र.६ मध्ये उपचाराला सुरुवात करण्यात आली. परंतु ५ दिवसात प्रकृतीमध्ये काहीच फरक पडत नसल्याने त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आले. तेथे त्यांच्यावर १२ दिवस उपचार करण्यात आले. आयसीयूमध्ये फरक पडल्यावर पुन्हा कक्ष क्र.६ मध्ये हलविण्यात आले. तेथे ३ दिवस उपचार केल्यानंतर कक्ष क्र. ११ मध्ये ६ दिवस उपचार करण्यात आले. अशाप्रकारे २६ दिवसांच्या प्रदीर्घ उपचारानंतर त्यांना १३ डिसेंबर २०२० रोजी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. या २६ दिवसांच्या काळात शासनाने उपलब्ध केलेल्या सेवेची योग्य ती अंमलबजावणी जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, विद्यमान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, डॉ. संजय राऊत, डॉ.आंधळकर, डॉ. रिजवान, डॉ. नाजनीन यांच्यासह कर्तव्यावर असलेल्या सर्व डॉक्टरांनी बजावलेले कर्तव्य व निष्ठेने केलेल्या उपचारांमुळे वयाच्या चौऱ्याहत्तर व्या वर्षी न्यूमोनिया आणि कोरोना अशा जीवघेण्या आजाराशी दोन हात करून त्यांनी या दोन्ही रोगांना हरविलं आणि बरे होऊन घरी गेले. यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात सेवा देणारे सर्व डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, कर्मचारी यांच्यासह जिल्हा रुग्णालयात दररोज नित्यनेमाने रुग्णांची आत्मियतेने विचारपूस करण्यासाठी येणारे ज्येष्ठ नगरसेवक फारूक पटेल आणि अमर नाईकवाडे तसेच गुणवत्ता पूर्ण जेवण देणारे अब्दुल गणी बागवान या सर्वांचे आभार व्यक्त करून पुष्पगुच्छ देत हृदयी सत्कार केले. यावेळी शेख रिजवाना, शेख वसीफ, पो.ना.शेख हनीफ, यशराज हेल्थ क्लब चे संचालक शेख नसीर, शेख खालेद, सा. द स्कूल एक्सप्रेस चे संपादक शेख एजाज़ आणि पत्रकार एस.एम.युसूफ उपस्थित होते.
एस.एम.युसूफ
पत्रकार ,बीड.
संपर्क - 9021 02 3121.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा