Breaking News

थंडीचा कडाका वाढला; नागरिकांनो तब्येतीची काळजी घ्या !

बीड (एस.एम.न्युज) - दोन आठवड्यांपासून गायब असलेल्या थंडीचे जोरात पुनरागमन झाले असून कडाका वाढला आहे. यामुळे नागरिकांनी तब्येतीची काळजी घ्यावी.दोन आठवड्यांपासून गायब झालेली थंडी पुन्हा जोमात परतली असून नागरिकांना हुडहुडी भरत आहे.           
     थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे स्वेटर, मफलर, टोपी, इत्यादींचा वापर करावा. झोपताना आवश्यक त्या प्रमाणात गरम अंथरूण-पांघरूण घ्यावे. रात्री झोपण्यापूर्वी तसेच सकाळी झोपेतून उठल्यानंतर चांगल्या गुळण्याकरून एक ग्लास गरम पाणी प्यावे. चहा घेताना शक्यतो आले व गवती चहा टाकलेला बिना दुधाचा कोरा चहा घ्यावा. सध्याचे वातावरण तब्येतीसाठी मोठे आणीबाणीचे आहे. थंडीत योग्य ती काळजी घेतली नाही तर नागरिकांना सर्दी-पडसे, डोकेदुखी, खोकला इत्यादी आजार हमखास होतात. डॉक्टरांना दाखवून यावर वेळीच योग्य ते उपचार करून घ्यावे. हे दुखणे अंगावर काढल्यास ते वाढून प्रथम न्यूमोनिया व नंतर कोरोना ची लागण होत असल्याचे जिल्हा रुग्णालयात येत असलेल्या रुग्णांच्या अनुभवावरून समोर येतच आहे. अशा प्रकारे जडत असलेली ही रोगांची साखळी आहे. यापासून वाचण्यासाठी थंडीपासून बचाव करणे  अत्यावश्यक आहे. यामुळे लहान-मोठे, वयोवृद्ध अशा सर्व नागरिकांनी थंडीपासून वाचण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. जेणेकरून न्युमोनिया व कोरोना सारख्या जिवावर बेतनाऱ्या रोगांपासून दुर राहता येईल. याकरिता सर्वप्रथम थंडीपासून वाचण्यासाठी प्राथमिकतेने काळजी घ्यावी.

एस.एम.युसूफ 
पत्रकार , बीड.
संपर्क - 9021 02 3121.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत