आ.मेटे साहेब, तुम्ही तरी खासबाग-मोमीनपुरा जोडणारा बिंदुसरा नदी वर पूल बनवा - एस.एम.युसूफ
बीड (प्रतिनिधी) - नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक असलेला खासबाग-मोमीनपुरा या मोठ्या प्रभागांना जोडणारा बिंदुसरा नदीवर पूल जनतेसाठी निर्माण करून द्यावा. असे साकडे पत्रकार एस.एम.युसूफ यांनी दिलेल्या पत्रकातून आमदार मेटे यांना घातले आहे.
साकडे घालताना दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून मोमीनपुरा, मुहम्मदीया कॉलनी, बीड मामला, खासबाग, शहेनशहा नगर, गणेश नगर, आसेफ नगर, विद्यानगर (पूर्व-पश्चिम), शिवाजीनगर, मित्र नगर, दत्तनगर, त्रिमूर्ती कॉलनी, राजुरी वेस, धांडे गल्ली, तेरवी लाईन, अज़ीज़पुरा, खंदक, कागदी वेस, हत्तीखाना या प्रभागांसह फ्रूट व आडत मार्केट, जिल्हा रुग्णालय, भाजी मार्केट, बाजारपेठ यासह खासबाग देवी मंदिर, तकिया मस्जिद कब्रस्तान, जमाअत-ए-महेदविया दर्गाह दायरा कब्रस्तान, दायरा कब्रस्तान कडे जाण्या-येण्यासाठी वापरला जातो. यामुळे येथे पूल निर्माण करावा ही मागणी वर्षानुवर्षांपासून होत आहे. मात्र आतापर्यंत या मागणीला स्थानिक आमदार, नगराध्यक्ष यांनी वेळोवेळी वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या आहेत. कधी आमदार तर कधी नगराध्यक्ष हे फार मोठा विकास केल्याचे आव आणत जनतेची चेष्टा केल्यासारखे नदी पात्रात चार सिमेंट पाईप टाकून त्यावर नदीतील रोडा व काही मुरूम अंथरून पूल बनवतात. पावसाळा आला की, नदीला आलेल्या पुरात हा कच्चा पूल वाहून जातो. हे आता दरवर्षी घडून येत आहे. परंतु याचे कुठलेही सोयरसुतक स्थानिक आमदार व नगराध्यक्षांना नसल्याचे वारंवार दिसून येते. म्हणून आता मेटे साहेब जसे बार्शी रोड चा बिंदुसरा नदीवरील पूल आपण बनवून दिला तसेच आता खासबाग देवी मंदिर ते जिल्हा परिषद उर्दू शाळा ढगे कॉलनी बायपास पर्यंत आवश्यक असलेला खासबाग-मोमीनपुरा जोडणारा बिंदुसरा नदीवर पूल जनतेसाठी बनवून द्यावा. असे साकडे पत्रकार एस.एम.युसूफ यांनी आमदार मेटे यांना दिलेल्या पत्रकातून घातले आहे.
एस.एम.युसूफ
पत्रकार, बीड.
संपर्क - 9021 02 3121
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा