बीड नगर परिषद ची मेहरबानी थोरातवाडीच्या वाटेला कचऱ्याच्या खाणी! -एस.एम.युसूफ
थोरातवाडीच्या वाटेला कचऱ्याच्या खाणी!
बीड (प्रतिनिधी) - शहरातील न्यू सुंदर मेडिकल स्टोअर्स ते रिपोर्टर भवन व थोरातवाडी कॉर्नर पर्यंत बीड नगर परिषद च्या मेहेरबानीने जागोजागी कचऱ्याच्या खाणी निर्माण झाल्याचे पत्रकार एस.एम.युसूफ यांनी दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे.
पत्रकात नमूद केले आहे की, बशीर गंज चौक ते जिल्हा रुग्णालय, तकिया मस्जिद ते जिल्हा रुग्णालय, राजुरी वेस ते जुने भगवान विद्यालय पर्यंतचे रस्ते आम्ही महत्प्रयासाने एका वर्षात तीन आंदोलने करून जनतेच्या सेवेत निर्माण करून देण्यास भाग पाडले. म्हणून या भागातील रस्ते देखणे व सुंदर झाले. मात्र याच रस्त्यांवर अनेक ठिकाणी जागोजागी कचऱ्याचे ढिगारे सातत्याने पडून असतात. हे ढिगारे उचलून नेण्याचे कार्य नगरपरिषदेची यंत्रणा करीत नाही. या कार्यासाठी नेमून दिलेले स्वच्छता निरीक्षक, मुकादम, सफाई कर्मचारी यांचेही साफ दुर्लक्ष असते. यामुळे या रस्त्यांवर कचऱ्याच्या खाणी निर्माण झाल्याचे नमूद केले असून म्हटले आहे की, कोरोना हा रोग माणसाने माणसांसोबत हस्तांदोलन केल्याने लवकर पसरत असल्याचे सांगितले जाते. या ऐवजी हा रोग रस्त्यांवर अशाप्रकारे अस्ताव्यस्त पसरलेल्या कचऱ्यामुळे व्हायला हवा होता. निदान कोरोनाच्या भितीने तरी बीड नगर परिषदेने शहराची स्वच्छता राखली असती. असे उद्विग्न मत ही पत्रकार एस.एम.युसूफ यांनी दिलेल्या पत्रकातून व्यक्त केले आहे.
एस.एम.युसूफ
पत्रकार , बीड.
संपर्क - 9021 02 3121
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा