Breaking News

बीड-पुणे रेल्वे चा जन्म होऊन बारसे ही झाले तरी अजून रेल्वे स्थानकासाठी शहर वाहतूक बसची प्रतीक्षाच! गोगलगाय लग्नाला निघून बारशाला पोहोचली होती, बीडात तर बारसे होऊनही शहर वाहतूक बस अजून रस्त्यांवर आली नाही

बीड-पुणे रेल्वे चा जन्म होऊन बारसे ही झाले तरी अजून रेल्वे स्थानकासाठी शहर वाहतूक बसची प्रतीक्षाच!गोगलगाय लग्नाला निघून बारशाला पोहोचली होती, बीडात तर बारसे होऊनही शहर वाहतूक बस अजून रस्त्यांवर आली नाही

*कोच - लईख़ शेख (लक्की सर)*
संपर्क - *920 980 1768*

बीड।एस.एम.न्युज़


रेल्वे स्थानकासाठी नागरिकांसह बीड शहरातील रस्त्यांनाही शहर वाहतूक बसची प्रतीक्षा असल्याचे मत संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांनी मांडले आहे.
                    याविषयी सविस्तर वृत्त असे की, १७ सप्टेंबर २०२६ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून बीड-पुणे रेल्वे सेवेचे उद्घाटन मोठ्या थाटात पार पडले. त्याला आता २६ ऑक्टोबर २०२६ रोजी पूर्ण ४० दिवस झाले. अर्थातच या रेल्वेचे बारसे झाले आहे. तरीसुद्धा रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी शहर वाहतूक बस सेवा नसल्याने प्रवाशांना जमेल त्याप्रमाणे रेल्वे स्थानक गाठण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. विशेष म्हणजे या रेल्वेला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्याने या मार्गावर रेल्वे यशस्वी झाली आहे.
                     आता रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना शासकीय तंत्रनिकेतन (गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक) पासून नाळवंडी नाका-तेलगाव नाका-बार्शी नाका-शिवाजीनगर पोलीस ठाणे चौक-पंचशील नगर-पालवन चौक मार्गे रेल्वे स्थानक. २) एमआयडीसी एरिया पासून रामतीर्थ-मन्सूर शाह दरगाह-नवा मोंढा रोड-जालना रोड-एस.टी.स्टँड-छत्रपती शिवाजी महाराज चौक-जुना नगर नाका-यशवंतराव चव्हाण नाट्यगृह-तुळजाई चौक-आशा टॉकीज चौक-धानोरा रोड-पालवन चौक मार्गे रेल्वे स्थानक. ३) आनंदवाडी पासून जालना रोड-एस.टी.स्टँड-छत्रपती शिवाजी महाराज चौक-धानोरा रोड-पालवन चौक मार्गे रेल्वे स्थानक. ४) करपरा नदीपासून पांगरी रोड-अंबिका चौक-राजीव गांधी चौक-जुना नगर नाका-यशवंतराव चव्हाण नाट्यगृह-पंचशील नगर रोड-पालवन चौक मार्गे रेल्वे स्थानक. ५) चऱ्हाटा फाटा चौक पासून बालेपीर-पोलीस मुख्यालय-धानोरा रोड-पालवन चौक मार्गे रेल्वे स्थानक. ६) शहिंशाह वली दरगाह पासून कंकालेश्वर मंदिर चौक-मोमीनपुरा बायपास रोड-बार्शी नाका-शिवाजीनगर पोलीस ठाणे चौक-पंचशील नगर रोड-पालवन चौक ते रेल्वे स्थानक व तेथून परत या सहा मार्गावरून शहर वाहतूक बस सुरू होण्याची प्रतीक्षा नागरिकांसह या रस्त्यांनाही असल्याचे मत एस.एम.युसूफ़ आणि रमेशराव गंगाधरे यांनी व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत