दत्तात्रय फाउंडेशन कडून जिव्हाळा बेघर निवारा केंद्राला जीवनावश्यक वस्तूंची मदत सामाजिक बांधिलकी जपत घडविले माणुसकीचे दर्शन
दत्तात्रय फाउंडेशन कडून जिव्हाळा बेघर निवारा केंद्राला जीवनावश्यक वस्तूंची मदत
सामाजिक बांधिलकी जपत घडविले माणुसकीचे दर्शन
पुणे।एस.एम.न्युज़ - समाजातील अनाथ मुले, वृद्धाश्रम तसेच गरजू आणि बेघर व्यक्तींना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या दौलतनगर, सन सिटी रोड, सिंहगड रोड, पुणे येथील दत्तात्रय फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत माणुसकीचे दर्शन घडविले.
दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तात्रय फाउंडेशनच्या वतीने गायत्री जवळगीकर, वीणा सातपुते,
राधिका कुलकर्णी, शर्मिला जोशी, यशश्री हूद्दार, सुनिता सोनवणे, समीर सातपुते, सदाशिव मल्लाप्पा तुकानावर यांच्या पुढाकाराने बीड शहरातील जिव्हाळा बेघर निवारा केंद्राचे संस्थापक अभिजीत वैद्य आणि राजू वंजारे यांना सुमारे १२ हजार रुपये किमतीचा किराणा माल तसेच वाहनातील डिझेलसाठी २ हजार रुपये रोख मदत देण्यात आली.
या मदतीमुळे बेघर निवारा केंद्रातील गरजू व्यक्तींसाठी मोलाचा हातभार लागला आहे. दत्तात्रय फाउंडेशन पुणे यांच्या माध्यमातून शहरातील महिला एकत्र येऊन अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि समाजातील गरजू घटकांसाठी किराणा माल व दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तू जमा करतात. या वस्तूंचे गरजू संस्था आणि सेवाभावी केंद्रांना वाटप करून सामाजिक कार्याला हातभार लावला जातो.
या मदतीदरम्यान फाउंडेशनच्या सदस्यांनी जिव्हाळा बेघर निवारा केंद्राच्या प्रतिनिधींची दुपारी २ वाजल्यापासून ते ४ वाजेपर्यंत एखाद्या नातेवाइकाप्रमाणे आवर्जून वाट पाहिली. त्यांच्यासाठी उत्तम व्यवस्था केली आणि आपुलकीने सन्मानपूर्वक मदत सुपूर्द केली. त्यांच्या या प्रेमळ वागणुकीतून केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर माणुसकी, जिव्हाळा आणि सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडले.
"गरजू व्यक्तींना मदत करणे म्हणजे केवळ वस्तूंचे वाटप नव्हे, तर त्यांच्या जीवनात आपुलकीचा आधार निर्माण करणे होय," हा संदेश दत्तात्रय फाउंडेशनच्या कार्यातून अधोरेखित झाला. दत्तात्रय फाउंडेशनने दाखविलेल्या या प्रेमळ सहकार्याबद्दल आणि माणुसकीच्या भावनेबद्दल जिव्हाळा बेघर निवारा केंद्राच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने दत्तात्रय फाउंडेशन मधील सर्व महिला सदस्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी जिव्हाळा बेघर निवारा केंद्राचे संचालक अभिजित वैद्य, व्यवस्थापक राजु वंजारे, मदतनीस यश वंजारे, छाया सरोदे यांच्यासह महिला, पुरुष लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा