इस्त्रो/नासा सेंटर लेव्हल निवड परीक्षेत अंजली नागनाथ कदमला ९४% गुण! विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी क्लस्टर कोटा नियम लागू; १३ हजार ६२५ विद्यार्थ्यांची नोंद
इस्त्रो/नासा सेंटर लेव्हल निवड परीक्षेत अंजली नागनाथ कदमला ९४% गुण
विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी क्लस्टर कोटा नियम लागू; १३ हजार ६२५ विद्यार्थ्यांची नोंद
परळी।एस.एम.न्युज़
इस्त्रो/नासा सेंटर लेव्हल निवड परीक्षेच्या निकालासह विद्यार्थी निवड प्रक्रियेबाबत संबंधित पत्रात सविस्तर तपशील देण्यात आला आहे. उपलब्ध पत्रानुसार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी निवड परीक्षा घेण्याचे नमूद करण्यात आले होते. या प्रक्रियेत क्लस्टर कोटा नियम, विद्यार्थ्यांची संख्या आणि विविध विभागांतील आकडेवारी यांचा समावेश आहे.
पत्रातील आकडेवारीनुसार, एकूण १३ हजार ६२५ विद्यार्थ्यांची नोंद नमूद करण्यात आली आहे. त्यापैकी ११ हजार ८६५ विद्यार्थ्यांची पुढील प्रक्रियेसाठी नोंद करण्यात आली होती, १ हजार ८०४ विद्यार्थ्यांचा अतिरिक्त तपशीलही देण्यात आला होता. अंतिम निवड आणि विद्यार्थ्यांच्या वर्गवारीबाबत अधिकृत पत्रातील निकष महत्त्वाचे ठरणार आहेत.या परीक्षा ११ ऑक्टोबर २०२६ या तारखेला संपन्न झाल्या.
इस्त्रो/नासा सेंटर लेव्हल निवड परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांतून, अंजली नागनाथ कदम हिने ११ हजार ८६५ विद्यार्थ्यांतून ९४%गुण घेऊन दुसरा क्रमांक पटकावला असल्याने, जिल्हा परिषद शाळा टोकवाडी ता. परळी, जि. बीड शाळेतील, शिक्षक व ग्रामस्थांनी पुष्प हार व पुष्प गुच्छ देऊन,सत्कार करून, पुढील कर्यासाठी शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले, तसेच परिसरातील मित्र, आप्तेष्ठ व नातेवाईकातून कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा