शहिंशहा नगर मध्ये मुख्य जलवाहिनी वरून अवैध नळ कनेक्शन; नगरपरिषदेने काही अवैध नळ कनेक्शन बंद केले! सर्व अवैध नळ कनेक्शन शोधून बंद केल्याशिवाय रोड चे काम करु नये; नागरिकांची मागणी
शहिंशहा नगर मध्ये मुख्य जलवाहिनी वरून अवैध नळ कनेक्शन; नगरपरिषदेने काही अवैध नळ कनेक्शन बंद केले
सर्व अवैध नळ कनेक्शन शोधून बंद केल्याशिवाय रोड चे काम करु नये; नागरिकांची मागणीबीड।एस.एम.न्युज़ - शहरातील शहिंशहा नगर मध्ये राष्ट्रवादी भवनपासून लक्ष्मण नगर टी पॉईंट पर्यंत डी.पी. रोड चे काम सुरू आहे. तत्पूर्वी बीड नगर परिषदे कडून पाणीपुरवठा करण्याकरिता आठ इंची पाईपलाईन टाकून प्रत्येक गल्ली मध्ये वॉल बसवून पिण्याचे पाणी प्रत्येक घराला व्यवस्थितरित्या मिळावे यासाठी पाण्याच्या पाईपलाईनची व्यवस्था करण्यात येत होती. परतुं या रोड वरील काही नागरिकांनी खासगी प्लंबर ला हाताशी धरून त्याला दहा ते पंधरा हजार रूपये मोबदला देऊन आठ इंची मुख्य पाईप लाईनलाच भोकं पाडून अवैधरित्या मुख्य जलवाहिनी वरून नळ कनेक्शन घेण्यात आली.
सदरील बाब बीड नगर परिषदेस कळाल्या नंतर आज दुपार पासून अवैध नळ कनेक्शन तोडण्यात आले. चार वाजेपर्यंत अवैध नळ कनेक्शन तोडण्यात आले असले तरी आणखीन पाच-पंचवीस अवैध नळ कनेक्शन घेण्यात आल्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
ही अतिशय गंभीर बाब लक्षात घेऊन मुख्य जलवाहिनीला भोकं पाडून त्यावरून अवैध नळ कनेक्शन घेणाऱ्या पाणी चोरांवर बीड नगर परिषदेने कडक कायदेशीर कार्यवाही करावी तसेच दोषींवर मोठी दंडात्मक कारवाई करावी. शिवाय सर्व अवैध नळ कनेक्शन तोडल्याशिवाय रोड चे काम करू नये. अशी मागणी या भागातील जागरूक व सुज्ञ नागरिकांकडून होऊ लागली आहे.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा