दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हृदयरोग रुग्णांसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलचा आरोग्यसेवेसाठी पुढाकार बीडमध्ये ११ ऑक्टोबरला भव्य हृदयरोग तपासणी व मार्गदर्शन शिबिर; पात्र रुग्णांना अँजिओप्लास्टी व बायपास सर्जरी मोफत
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हृदयरोग रुग्णांसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलचा आरोग्यसेवेसाठी पुढाकार
बीडमध्ये ११ ऑक्टोबरला भव्य हृदयरोग तपासणी व मार्गदर्शन शिबिर; पात्र रुग्णांना अँजिओप्लास्टी व बायपास सर्जरी मोफत
बीड।एस.एम.न्युज़ - मराठवाड्यातील दुष्काळी व प्रतिकूल परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात हृदयरोगाची तपासणी व उपचार उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने *जैन सोशल फेडरेशन, अहमदनगर संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल, बीड* यांच्या वतीने विशेष हृदयरोग तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर *रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत* जालना रोड, शाहू बँकेजवळील *आनंदऋषीजी डायग्नोस्टिक सेंटर* येथे होणार आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक अडचणी वाढल्या असून, अनेक कुटुंबांकडून आर्थिक कारणांमुळे आवश्यक आरोग्य तपासणी व उपचार पुढे ढकलले जातात. ही बाब लक्षात घेऊन *केवळ आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही नागरिकाला आवश्यक हृदयरोग उपचारांपासून वंचित राहावे लागू नये*, यासाठी हॉस्पिटलच्या वतीने आरोग्यसेवेला प्राधान्य देण्यात येत आहे.
या शिबिरासाठी *बीडचे भूमिपुत्र, DNB (Cardiology) हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अमित भराडिया* यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. नागरिकांची हृदयरोग तपासणी करून त्यांच्या आरोग्याच्या स्थितीनुसार आवश्यक उपचार व पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
*विशेष दरात हृदयरोग तपासणी*
शिबिरामध्ये हृदयरोग तज्ज्ञांची *OPD तपासणी व सल्ला केवळ ₹२०० मध्ये* उपलब्ध राहणार असून, OPD सोबत *ECG मोफत* करण्यात येणार आहे. तसेच *2D Echo फक्त ₹९००* आणि *अँजिओग्राफी ₹३,०००* या विशेष दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
*पात्र रुग्णांना अँजिओप्लास्टी व बायपास सर्जरी मोफत*
हृदयरोगाचे निदान झाल्यानंतर आवश्यकतेनुसार पुढील उपचारांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. *MJPJAY व PMJAY अंतर्गत पात्र रुग्णांना योजनेच्या नियमानुसार अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी तसेच आवश्यक हृदयावरील उपचार व शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध होऊ शकतात.*
छातीत दुखणे, छातीमध्ये जडपणा जाणवणे, दम लागणे, जास्त घाम येणे, चक्कर येणे किंवा हृदयाची धडधड वाढणे यांसारखी लक्षणे जाणवत असल्यास नागरिकांनी दुर्लक्ष न करता हृदयरोगाची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
*महिन्यातून दोनदा हृदयरोग तज्ज्ञांची सेवा*
बीडकर नागरिकांच्या सोयीसाठी *डॉ. अमित भराडिया* यांची हृदयरोग तपासणी व मार्गदर्शन सेवा *दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी* आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहणार आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या या आरोग्यसेवा उपक्रमातून *ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, ज्येष्ठ नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.* बीड शहरासह परिसरातील नागरिकांनी *दि. ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या विशेष हृदयरोग तपासणी शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा*, असे आवाहन आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.
*नोंदणी व अधिक माहितीसाठी : ८२६२००९०९१*
*सकल जैन समाज, बीड*
*जैन सोशल फेडरेशन, अहमदनगर संचलित*
*आनंदऋषीजी हॉस्पिटल, बीड*
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा