Breaking News

ए.के. डिजिटल ग्राफिक्स चे डायरेक्टर आयान खान यांचा हृदयी सत्कार शगुन स्टील अँड फर्निचर व शिबु खान यांच्याकडून सन्मान

ए.के. डिजिटल ग्राफिक्स चे डायरेक्टर आयान खान यांचा हृदयी सत्कार

शगुन स्टील अँड फर्निचर व शिबु खान यांच्याकडून सन्मान

बीड।एस.एम.न्युज़

शहरातील सुप्रसिद्ध ए.के. डिजिटल ग्राफिक्स चे डायरेक्टर आयान खान यांच्या कार्याची दखल घेऊन शगुन स्टील अँड फर्निचर आणि "क्या बोलती बीड की पब्लिक" फेम शिबु खान यांनी त्यांना भेटवस्तू देऊन ह्रदयी सत्कार करत सन्मान केला. यावेळी मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
                       यावेळी बोलताना आयान खान म्हणाले की, शगुन स्टील अँड फर्निचर व शिबु खान यांच्याकडून करण्यात आलेल्या या सन्मानामुळे मला सोशल मीडिया या नवीन जगाचा अनोखा अनुभव घेता आला. या निमित्ताने आयोजकांनी केलेला हा सत्कार माझ्यासाठी विशेष असून हा आनंदाचा सन्मानाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. केलेला सत्कार आणि दिलेल्या सन्मानाबद्दल त्यांनी शगुन स्टील अँड फर्निचर व शिबु खान यांचे विशेष आभार व्यक्त केले.
                  आयान खान यांनी गेल्या काही वर्षात डिजिटल क्षेत्रात आपल्या विशेष कलेने अल्पावधीतच नाव कमावले. कोणतेही बॅनर असो ते आपल्या कल्पकतेने असे काही तयार करतात की, पाहणारा पाहतच राहतो. त्यांच्या अशाच कलेची नोंद घेऊन त्यांचा विशेष सत्कार करून सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत