उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! आता गुरुकुल टॅलेंट सर्च परीक्षा उर्दू माध्यमातूनही
उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी!
आता गुरुकुल टॅलेंट सर्च परीक्षा उर्दू माध्यमातूनही
जिल्हा समन्वयक उस्मान खान यांचा पुढाकार
बीड।एस.एम.न्युज़ - विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देत त्यांच्यात स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करण्याच्या उद्देशाने गुरुकुल एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षा (G.T.S.)’ आयोजित करण्यात आली आहे. यंदाची विशेष बाब म्हणजे ही परीक्षा उर्दू व सेमी इंग्रजी माध्यमातील इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार असून, उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कॉर्डिनेटर उस्मान खान यांनी केले आहे.
ही राज्यस्तरीय परीक्षा रविवार, २४ जानेवारी २०२७ रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शालेय स्तरापासूनच स्पर्धा परीक्षांची गोडी निर्माण व्हावी, त्यांच्या ज्ञानाचा व बुद्धिमत्तेचा कस लागावा आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, हा या परीक्षेचा प्रमुख उद्देश आहे.
तालुकास्तरावर प्रत्येक इयत्तेतील गुणवंतांना पारितोषिके गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत तालुकास्तरावर प्रत्येक इयत्तेतील प्रथम १० विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी गोल्ड मेडल, द्वितीय क्रमांकासाठी सिल्व्हर मेडल, तृतीय क्रमांकासाठी ब्राँझ मेडल, तर पुढील गुणवंत विद्यार्थ्यांनाही पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
जिल्हास्तरावर रोख पारितोषिकांसह ट्रॉफी
जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांसाठीही विशेष पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. प्रत्येक इयत्तेत प्रथम क्रमांकासाठी ₹१,१००, द्वितीय क्रमांकासाठी ₹१,०००, तृतीय क्रमांकासाठी ₹९००, चतुर्थ क्रमांकासाठी ₹८०० आणि पाचव्या क्रमांकासाठी ₹७००, तसेच ट्रॉफी देण्यात येणार आहे.
राज्यस्तरावरील गुणवंतांना हजारोंची बक्षिसे
राज्यस्तरावर प्रत्येक इयत्तेतील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांना अनुक्रमे ₹४,०००, ₹३,००० आणि ₹२,००० अशी रोख पारितोषिके व ट्रॉफी देण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा केवळ ज्ञानाची चाचणी न राहता त्यांच्या भविष्यातील वाटचालीला प्रेरणा देणारे व्यासपीठ ठरणार आहे.
*गुणवंत विद्यार्थ्यांसाठी थेट ‘इस्रो सफर’!*
या परीक्षेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे इयत्ता ३ री ते ८ वीमधील राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांना ‘इस्रो सफर’ची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या कार्याची प्रत्यक्ष माहिती व अनुभव घेता यावा, यासाठी ही विशेष संधी देण्यात आली आहे. मागील वर्षांच्या यशस्वी ‘इस्रो सफरी’ची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे.
स्पर्धात्मक परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला योग्य दिशा मिळाल्यास भविष्यात NDA, UPSC, IIT, JEE, BITSAT यांसारख्या विविध महत्त्वाच्या परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी शालेय स्तरापासूनच मजबूत पाया तयार होऊ शकतो, असा संदेशही आयोजकांनी दिला आहे.
उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांनाही राज्यस्तरीय व्यासपीठावर चमकण्याची संधी मिळत असल्याने पालकांनी आपल्या पाल्यांना या परीक्षेत सहभागी करून घ्यावे आणि ‘ज्ञान, गुणवत्ता आणि यशाच्या दिशेने एक पाऊल’ टाकावे, असे आवाहन जिल्हा कॉर्डिनेटर उस्मान खान यांनी केले आहे.
उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी ही संधी दवडण्यासारखी नाही—गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत सहभागी व्हा आणि गुणवत्तेच्या जोरावर ‘इस्रो सफरी’चे स्वप्न साकार करा! जिल्ह्यातील उर्दू माध्यमातील शिक्षकांनी व गुणवत्त विद्यार्थ्यांनी जिल्हा समन्वयक उस्मान खान यांना *9423478406* या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
👇👇👇👇👇
___________________________________________
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा