Breaking News

चिचोंडी पाटील येथे एसटी बस स्थानक निर्माण करा; पशुवैद्यकीय रुग्णालय इतरत्र हलवा!

बस स्थानकासाठी शासकीय प्रशस्त जागा
चिचोंडी पाटील येथे एसटी बस स्थानक निर्माण करा; पशुवैद्यकीय रुग्णालय इतरत्र हलवा!

एस.एम.युसूफ़, रमेश गंगाधरे यांची जबाबदार मंत्र्यांसह अधिकाऱ्यांकडे जोरदार मागणी

बीड।एस.एम.न्युज़

बीड-अहिल्यानगर (अहेमदनगर) राज्यमार्गावर असलेल्या चिचोंडी पाटील या गावासाठी राज्यमार्गावर बस स्थानक निर्माण करण्यात यावे तसेच पशुवैद्यकीय रुग्णालय इतरत्र हलवावे अशी जोरदार मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, परिवहन मंत्री, अहिल्यानगर चे पालकमंत्री, खासदार, आमदार, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना बीड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठविलेल्या निवेदनातून एस.एम. न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांनी केली आहे.
                     या विषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बीड - अहिल्यानगर (अहेमदनगर) राज्यमार्गावर असलेल्या चिचोंडी पाटील या गावासाठी याच राज्यमार्गावर असलेले बस स्थानक काही महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या रस्ता रुंदीकरणात राज्यमार्गाच्या निर्माणावेळी जमीन दोस्त करून तेथे रस्ता रुंद करण्यात आला. तेव्हापासून प्रवाशांना ऊन-पाऊस सहन करत रस्त्यावरच थांबून बसची वाट पहावी लागत आहे.
              पूर्वीच्या मानाने आता चिचोंडी पाटील गावाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गावातील नागरिकांना शेतीवाडी असल्याने तसेच वेगवेगळ्या कामासाठी नेहमी   अहिल्यानगर (अहेमदनगर), पुणे, मुंबई यासारख्या महानगरांसोबतच बीड, उस्मानाबाद आताचे धाराशिव, सोलापूर, लातूर सारख्या जिल्ह्यातही याच रस्त्यावरून ये-जा करावी लागते. म्हणून चिचोंडी पाटील गावात एसटी बस स्थानक निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे.
              याकरिता याच राज्यमार्गावर चिचोंडी पाटील गावाच्या हद्दीत असलेल्या आणि स्थलांतरित करण्यात आलेल्या शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या पूर्वीच्या जागी नवीन एसटी बस स्थानक निर्माण करण्यात यावे.
               सध्या त्या जागी पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू असून एवढ्या मोठ्या जागेच्या मानाने तिथे उपचारासाठी तेवढ्या संख्येने जनावरं येत नाहीत. पशुवैद्यकीय रुग्णालय गावात कुठेही अन्य जागी स्थलांतरित केले जाऊ शकते. मोक्याच्या ठिकाणी राज्यमार्गावर असलेल्या येथील शासकीय जागी एसटी बस स्थानक निर्माण करण्यात यावे. ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळावी. जेणेकरून हिवाळा, उन्हाळा, पावसाळा कोणताही ऋतू असला तरी प्रवाशांना त्रास होणार नाही. जो सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात होतोय.
                  या जागेवर एसटी बस स्थानक निर्माण झाल्यानंतर गावातील सुशिक्षित तरुणांना विविध व्यवसाय करण्यास चालना मिळेल. ज्यामुळे रोजगार मिळण्याची संधी वाढेल आणि प्रवाशांची होणारी गैरसोयही टळेल म्हणून निवेदनाचा सारासार विचार करून या प्रश्नावर शासकीय-प्रशासकीय पातळीवर लवकरात लवकर कार्य करून बीड - अहिल्यानगर (अहेमदनगर) राज्यमार्गावर चिचोंडी पाटील येथे एसटी बस स्थानक निर्माण करावे आणि पशुवैद्यकीय रुग्णालय गावात इतरत्र हलवावे अशी मागणी एस.एम.युसूफ़ आणि रमेशराव गंगाधरे यांनी केली आहे.
👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत