Breaking News

अतिक्रमणाचा झालायं बुजबूजाट; वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त - फारुख शेख


अतिक्रमणाचा झालायं बुजबूजाट; वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त - फारुख शेख

बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील राजीव गांधी चौक, भगवान बाबा चौक, पाणी टाकी ते आदर्श नगर तसेच नगरनाका कडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
रात्रीच्या वेळेस चहा, कोल्ड्रिंक, मसाला दूध, कुल्फी तसेच विविध खाद्यपदार्थांच्या गाड्या थेट मुख्य रस्त्यावर उभ्या करून व्यवसाय केला जात असल्याचे दिसून येत आहे. तसेच सकाळच्या वेळेस काही विक्रेते रस्त्यावरच भाजीपाला व इतर वस्तू विक्रीस ठेवत असल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.
या गंभीर समस्येबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शेख फारुख यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले असून, या परिसरात सतत वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पादचारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले आहे.
विशेष म्हणजे या परिसरात रुग्णालये असल्यामुळे रुग्णवाहिका व इतर आपत्कालीन सेवांना वेळेत मार्ग मिळणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र अतिक्रमणामुळे रुग्णवाहिकांचा वेळ वाया जात असून रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता वाढत आहे.
संबंधित प्रशासनाने तात्काळ रस्त्यावरील अतिक्रमण हटवून बेकायदेशीर व्यवसायावर कारवाई करावी तसेच वाहतूक सुरळीत राहण्यासाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शेख फारुख यांनी केली आहे.
लवकर कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत