Breaking News

सय्यद अशरफ़ शरीफ़ मियाँ पवित्र हज यात्रेसाठी रवाना; पीर ओ मुर्शिद हज़रत सय्यद फ़रीदोद्दीन निज़ामी यांची प्रमुख उपस्थिती

सय्यद अशरफ़ शरीफ़ मियाँ पवित्र हज यात्रेसाठी रवानापीर ओ मुर्शिद हज़रत सय्यद फ़रीदोद्दीन निज़ामी यांची प्रमुख उपस्थिती

अहेमदनगर।एस.एम.न्युज़
अहेमदनगर शहरातील दरगाह दायरा येथील रहिवासी आणि एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांचे मेव्हणे सय्यद अशरफ शरीफ मियाँ (मेजर- फिटर) हे पवित्र हज यात्रेसाठी दिनांक ०८ मे २०२६ शुक्रवार रोजी रवाना झाले. त्यांना निरोप देण्याकरिता क़ौम ए महेदवीयाचे पीर ओ मुर्शिद हज़रत सय्यद फ़रीदोद्दीन निज़ामी यांची प्रमुख उपस्थिती होती.

                      जगभरात लवकरच साजरी होणाऱ्या ईद उल अज़्हा (बकरी ईद) निमित्ताने इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र असे फ़र्ज़ (कर्तव्य) पूर्ण करण्याकरिता जगभरातून मुस्लिम बंधू-भगिनी पवित्र हज यात्रेकरिता सौदी अरेबियातील मक्का-मदिना येथे जात आहेत. आपल्या भारत देशातूनही विविध राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मुस्लिम बंधू-भगिनी हज यात्रेसाठी कुच करत आहेत. अहेमदनगर शहरातील दरगाह दायरा येथील रहिवाशी सय्यद अशरफ शरीफ मियाँ हेही हज यात्रेसाठी दगडीचाल येथून रवाना झाले. या यात्रेकरिता त्यांना निरोप देण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून अनेक नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिर ओ मुर्शिद हज़रत सय्यद फ़रीदोद्दीन निज़ामी यांच्यासह सर्व नातेवाईकांनी त्यांची हज यात्रा सुखरूप होवो आणि त्यांचे हज परिपूर्ण होवो अशा शुभेच्छांसह त्यांना निरोप दिला. रवाना होताना सय्यद अशरफ मियांँ यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून आपल्या भारत देशात सुख व शांतता राहावी यासाठी हज यात्रेतील सर्व पवित्र स्थळांत दुआ करण्याचे आश्वासन दिले.

👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत