ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे यांनी पोलिसांसारखे कर्तव्य निभावले दारूच्या व्यसना पायी मृत झालेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटवली
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे यांनी पोलिसांसारखे कर्तव्य निभावले
दारूच्या व्यसना पायी मृत झालेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटवली
बीड।एस.एम.न्युज़
दिनांक २७ एप्रिल २०२६ सोमवार रोजी प्रसिद्धी माध्यमातून एका अज्ञात मृत व्यक्तीचा बीडच्या रजिस्ट्री ऑफिसच्या आवारातील पत्र्याच्या कंपाउंडमध्ये अज्ञात मृतदेह आढळल्याची बातमी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांच्या मार्फत प्रकाशित झाली होती. अज्ञात व्यक्ती ही शहरातील समाधान, रायगड, सौरभ, कोर्ट कॅन्टीन आदी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत असल्याचे समजल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे यांनी अनेकांकडे चौकशी करून तसेच निवारा केंद्राचे संचालक अभिजीत वैद्य यांच्याकडून अशोक आगलावे, राहणार डोमरी, ता.पाटोदा जि. बीड येथील रहिवासी असल्याची माहिती शोधून काढली. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वासुदेव मिसाळ यांच्यामार्फत संबंधित विभागाचे सहाय्यक पोलीस अधिकारी साळवे यांची भेट घेऊन त्यांना अज्ञात व्यक्तीचे नाव व गावाचे नाव कळवले. निरगुडीचे प्राचार्य डी.जी.तांदळे यांनी देखील शोध घेण्याचा प्रयत्न केला. शेवटी पाटोदा येथील रोटी बँक चे संचालक संतोष गर्जे आणि डोमरी गुरुकुल येथील सुदर्शन शिक्षका मार्फत अशोक आगलावे याचे मावसभाऊ धनंजय आगलावे यांचा शोध लागला. त्यांच्याशी पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेले सहाय्यक फौजदार साळवे, राऊत यांनी संपर्क साधून संबंधित मृत व्यक्ती विषयी माहिती देऊन शिवाजीनगर पोलीस स्टेशनला बोलवून घेतले. दिनांक ३० एप्रिल २०२६ गुरुवार रोजी सकाळी अशोकचा भाऊ नंदकुमार आगलावे इंदौरहून बीडला आला होता. त्याच्यासोबत चुलते रणधीर आगलावे, मावस भाऊ धनंजय आगलावे शिवाजीनगर पोलीस स्टेशनला उपस्थित राहून संबंधित मृतदेह ताब्यात घेत शहरातील अंकुश नगर भागातील स्मशान भूमीमध्ये दुपारी दोनच्या दरम्यान अंत्यविधी केला.
मयत अशोक आगलावे हा बारावी पास होता. त्याला संगणकाचे सुद्धा ज्ञान होते. पूर्वी तो पांगरी रोड येथील दीनदयाळ संस्थेमध्ये साधारण चार-पाच वर्षांपूर्वी काम करत असल्याची माहिती मिळाली असून त्यावेळी तो व्यसन करत नव्हता. त्याचे लग्न ही झालेले नव्हते. दारूचे व्यसन जडल्यानंतर त्याने विविध हॉटेल्स मध्ये वेटर म्हणून काम केले. त्याच्याकडे आधार कार्ड, मोबाईल सुद्धा नव्हते. त्याने जिथे जिथे काम केले तिथे कुणालाही स्वतःबद्दल काहीही माहिती सांगितलेली नव्हती. तो मयत झाल्यानंतर डॉ. संजय तांदळे यांनी त्याची ओळख पटविल्यानंतर माहिती मिळाली तसेच त्याचे आई-वडील गावाकडेच राहत असून त्यांना शेतीवाडी नाही ते मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवतात. त्याला एक भाऊ असून तो इंदौर येथील एका कंपनीत काम करतो. अशी माहिती मिळाल्याचे मातृभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे यांनी सांगितले.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा