जनगणनेत नागरिकांनी सहभागी व्हावे; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते फारुख शेख यांचे आवाहन
जनगणनेत नागरिकांनी सहभागी व्हावे; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते फारुख शेख यांचे आवाहन
बीड (एस.एम.न्युज़)- देशाच्या विकासासाठी आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनगणना ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. प्रत्येक नागरिकाने जनगणनेत आपली अचूक माहिती नोंदवावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते फारुख शेख यांनी केले आहे.
सध्या नागरिकांसाठी ऑनलाईन स्व-गणना (Self Enumeration) सुविधा उपलब्ध असून नागरिकांनी १५ मे २०२६ पर्यंत अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपली माहिती भरावी. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर मिळणारा सेल्फ एन्युमरेशन आयडी जतन करून ठेवावा, असे फारुख शेख यांनी सांगितले.तसेच ज्या नागरिकांना ऑनलाईन माहिती भरता येणार नाही, त्यांच्यासाठी १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ दरम्यान जनगणना कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती संकलित करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, असेही फारुख शेख यांनी म्हटले आहे.
जनगणनेमुळे शासनाला लोकसंख्या, शिक्षण, रोजगार, घरे, पाणी, वीज, आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधांची माहिती मिळते. याच माहितीच्या आधारे विकासकामांचे नियोजन केले जाते. त्यामुळे प्रत्येक नागरिकासाठी जनगणनेत सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे.
“आपली माहिती अचूक द्या आणि देशाच्या विकासात आपला सहभाग नोंदवा,” असे आवाहन फारुख शेख यांनी केले आहे.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा