Breaking News

हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी यांची २० एप्रिल रोजी पाचवी पुण्यतिथी राजकीय लोकांनो, रेड्डी साहेबांना विसरू नका

हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी यांची २० एप्रिल रोजी पाचवी पुण्यतिथी
राजकीय लोकांनो, रेड्डी साहेबांना विसरू नका 

दिनांक ८ डिसेंबर २०१३ रोजी मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्वप्रथम मोर्चा काढून हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले होते. याप्रसंगी बीड जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अब्दुल्ला सय्यद, नूर टेलर, प्रवीण पालीमकर, ज़फ़र काज़ी, सिकंदर टेलर आदी उपस्थित होते.
रेड्डी साहेबांचे प्रिय शिष्य फारुख शेख यांच्या लग्नप्रसंगी शुभेच्छा देताना

एआयएमआयएम पक्षाच्या बीड जिल्हा प्रवक्ता पदी निवड झाल्यानंतर त्यांना नियुक्तीपत्र देताना ज्येष्ठ नेते अब्दुस्सलाम सेठ, सय्यद सैफ़अली उर्फ लालू भैय्या, एजाज शेख खन्ना मामा, ॲड. शफिक शेख उर्फ भाऊ आणि अय्यूब पठाण

तहहयात अजातशत्रू राहिलेले हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी यांची दिनांक २० एप्रिल २०२६ सोमवार रोजी पाचवी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने निदान राजकीय लोकांनी तरी रेड्डी साहेबांना विसरू नये.
                  हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी हे अवघे ५४ वर्षांचे आयुष्य जगले. या कालावधीत त्यांनी सदैव सर्वसामान्यांसाठी आवाज उठविला. अनेक सामाजिक मुद्द्यांसाठी नेहमी लढले, झगडले. उपोषण, मोर्चे, धरणे असे नाना आंदोलन केले. परंतु इतर राजकारण्यांसारखे त्यांना राजकीय छक्के-पंजे, लांडी-लबाडी करणे कधीच जमले नाही. म्हणून ते जीवनात इतर राजकारण्यांसारखी माया जमवू शकले नाही. तहहयात कफल्लकच राहिले आणि २० एप्रिल २०२१ रोजी जग सोडून गेले. त्यांच्या जाण्याने सामाजिक क्रांती आणण्यासाठी झटणारा एक लढवय्या अवलिया समाजाने गमविला.
               राजकारणात सर्वप्रथम त्यांना मान-सन्मान दिला तो निजाम शेख (सरकार) यांनी आणि त्यांच्यानंतर ॲड. शफिक शेख (भाऊ) यांनी. रेड्डी साहेबांतील माणुसकीसाठी जगणारा माणूस या दोन्ही नेत्यांनी अनेक वर्षे जवळून पाहिला, अनुभवला. गेल्या वर्षी रेड्डी साहेबांच्या चौथ्या पुण्यतिथी निमित्ताने निजामभाईंनी बेघर निवारा गृहात अन्नदान करून रेड्डी साहेबांचे स्मरण केले होते. आपल्या जुन्या साथीदाराचे मरणोपरांत स्मरण करून निजामभाईंनी माणुसकीचे दर्शन घडविले होते. त्यांच्यासारखेच इतर राजकारण्यांनी सुद्धा रेड्डी साहेबांच्या पुण्यतिथी निमित्ताने दरवर्षी काही ना काही सामाजिक उपक्रम किंवा कार्यक्रम घ्यावे, राबवावे. हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी सारख्या निस्वार्थी, निष्कपट, निष्कलंक व्यक्तिमत्वाला विसरू नये.
*- एस.एम.युसूफ़*
*विशेष सुचना*
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लवकरच लेखन कार्य संपूर्ण दिवसभर
वेळ - सकाळी ०९ ते रात्री ०९ वाजेपर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत