Breaking News

नगराध्यक्षा प्रेमलता ताई पारवे, मुख्याधिकारी शैलेश फडसे तेवढेच जबाबदार

नगराध्यक्षा प्रेमलता ताई पारवे, मुख्याधिकारी शैलेश फडसे तेवढेच जबाबदार

*पारवेताईंनी पगारे, माने, देशमुख यांना नोटीस दिली* 

*मुख्याधिकारी शैलेश फडसे यांना बगल दिली*

*बीड।एस.एम.न्युज़ -*

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने बीड नगर परिषदेने शहरात हैदोस घातल्यानंतर प्रसिद्धी माध्यमातून याची मोठ्या प्रमाणात चिरफाड करण्यात आली, त्यानंतर नगराध्यक्षा प्रेमलता पारवे ताई यांनी बैठक घेऊन नगरपरिषदेतील पगारे, माने आणि देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. समाधानकारक उत्तर न दिल्यास निलंबनाची कारवाई करण्याचेही म्हटले. मात्र मुख्याधिकारी शैलेश फडसे यांना का बगल देण्यात आली? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. 

*तत्कालीन नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांची आठवण येऊ लागली* 

नगराध्यक्षा प्रेमलता पारवे ताई यांनी मुख्याधिकारी शैलेश फडसे यांना बगल दिल्याने त्यांच्या या पावलामुळे तत्कालीन कायमस्वरूपी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी निलावाड या तत्कालीन जोडीची आठवण येवू लागली आहे. बीड नगर परिषदेत जमलेली ही जोडी एक दुसऱ्यांना अशी काही सांभाळून घेत होती की, निलावाड यांच्या बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदावरून झालेल्या बदल्या सुद्धा अनेकदा तत्कालीन नगराध्यक्षांनी मंत्रालयात जाऊन रद्द करायला लावल्या होत्या. एक दुसऱ्याला सांभाळून घेण्याच्या नादात या जोडीने बीड शहराची पूर्णतः वाट लावून टाकली होती. याचेच फळ म्हणून आज बीड शहराची जी काही दुर्दशा आहे त्यात या जोडीचा खूप मोठा हात आहे. 

*भीम कन्येच्या कार्यकाळात जयंतीला लागले गालबोट*  

बीड नगर परिषदेत प्रेमलता पारवे ताई यांच्या रूपात प्रथमच एक भीम कन्या नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्याचा अभिमान बीड शहरवासियांना निश्चितपणे झालेला आहे. परंतु दुर्दैव आहे की, याच भीम कन्येच्या कार्यकाळात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्याच जयंतीला रस्त्यांवर खडी टाकून, पुन्हा ती उचलून, रस्त्यांवर चिखल होईपर्यंत पाणी मारून बीड नगर परिषदेने असे काही गालबोट लावले की सगळीकडे थू-थू होऊ लागली आहे.

*निदान याचे भान ठेवून तरी कारवाई व्हायला हवी*

पगारे, माने, देशमुख या तिकडीसह मुख्याधिकारी म्हणून शैलेश फडसे यांचे उत्तरदायित्व या तिघांपेक्षा कितीतरी मोठे आहे आणि त्यांनी आपल्या याच उत्तरदायित्वात कसूर केल्याने त्यांनाही कारणे दाखवा नोटीस द्यायला हवी होती. पण प्रेमलता पारवे ताईंनी असे न करता फक्त खालच्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

*कायदा सुव्यवस्था बिघडल्यास पोलीस अधीक्षक जबाबदार तर बेजबाबदार राहणारे मुख्याधिकारी का नाही?*

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने शहरात केलेल्या उपद्व्यापाला बीड नगर परिषदेतील राजकीय नेते, पदाधिकारी, मुख्याधिकारी आणि कर्मचारी असे सर्वचजण जबाबदार आहेत. यामुळे जसे कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी कमी पडले तरीही या सर्वांचे खापर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या डोक्यावर फोडले जाते, तसे बीड नगर परिषदेतील कनिष्ठ अधिकारी, अभियंते किंवा कर्मचारी कोणीही असो त्यांनी कर्तव्यात कसूर केल्यावर मुख्याधिकारी यांचाही त्यात वाटा असतो. हे विसरता कामा नये. वरिष्ठ अधिकारी जेव्हा कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवू शकत नाही, तेव्हाच कार्य व्यवस्थित होत नाही. हे लक्षात घेऊन हे प्रकरण हाताळायला हवे.

*मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षा दोन्हीही जबाबदार*

बीड नगरपरिषद यंत्रणेने शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने घातलेल्या धुळगुसमुळे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनाही कारणे दाखवा नोटीस द्यायलाच हवी. मात्र त्यांना नोटीसीतून बगल देण्यात आली आहे. असे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला असून इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसारखेच मुख्याधिकारी शैलेश फडसे आणि नगराध्यक्षा म्हणून प्रेमलता ताई पारवे ही जोडी सुद्धा तेवढीच जबाबदार आहे.

*फक्त नोटीस बजावून चालणार नाही, कठोर कारवाई व्हावी*

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने शहरात बीड नगर परिषदे कडून जो हैदोस घालण्यात आला त्याविरुद्ध फक्त नोटीस बजावून चालणार नाही, तर हा हैदोस करणारे राजकीय पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांना फक्त नोटीस देऊन जमणार नाही. दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी. अशी मागणी भीम जनतेसह बीड शहरवासीयांकडून होऊ लागली आहे.

*विशेष सुचना*

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लवकरच लेखन कार्य संपूर्ण दिवसभर 

वेळ - सकाळी ०९ ते रात्री ०९ वाजेपर्यंत

*- एस.एम.युसूफ़*

संपर्क - *9021 02 3121

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत