आमदार फंडातून होत असलेल्या महेदवीया दायरा कब्रस्तानच्या कामात गुंडाकडून अडथळा अभियंता, गुत्तेदारास दमदाटी; अध्यक्षास मारहाण, जिवे मारण्याची धमकी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आमदार फंडातून होत असलेल्या महेदवीया दायरा कब्रस्तानच्या कामात गुंडाकडून अडथळा
अभियंता, गुत्तेदारास दमदाटी; अध्यक्षास मारहाण, जिवे मारण्याची धमकी
पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील मोमीनपुरा भागात असलेल्या महेदवीया दायरा कब्रस्तानच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम आमदार फंडातून होत असून सदरील कामात दस्तगीर नामक गुंडाने पैशांची मागणी करत कमिटीच्या अध्यक्षास मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली तसेच अभियंता आणि गुत्तेदारास ही दमदाटी केली. याप्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी महेदवीया दायरा कब्रस्तान कमिटीचे अध्यक्ष परवेज़ मोहम्मद यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, महेदवीया दायरा कब्रस्तान च्या संरक्षक भिंतीचे बांधकाम आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आमदार फंडातून चालु आहे. कामाची देखरेख व पाहणी करिता दिनांक २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ०५:००वा. च्या सुमारास दायरा कब्रस्तान, मोमीनपुरा बीड येथे बांधकामाच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेलो असता सदर ठिकाणी गुंड गुलाम दस्तगीर रा. मोमीनपुरा, पेठ बीड याने तिथे येवून, तुम्ही मला न विचारता कसे काय काम करता, मी या भागाचा दादा आहे. हे काम तुम्ही करु नका तुम्ही जर हे काम केले तर तुम्हाला जिवे मारुन टाकेन असे म्हणून गुंड दस्तगीर याने शिवीगाळ करत धक्काबुक्की करून चापटाने मारहाण केली. म्हणून गुंड गुलाम दस्तगीर रा. मोमीनपुरा, पेठ बीड याच्या विरुध्द पेठ बीड पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला असून गुंड दस्तगीर हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला कुख्यात गुंड असल्याने त्याच्यावर आतापर्यंत विविध पोलीस ठाण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे बोलले जात असून यापूर्वी माजलगाव येथील एका व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करून त्याने खंडणी मागितल्याची माहितीही मिळाली असल्याचे सांगितले आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा