Breaking News

वाहनधारकांनो, HSRP नंबर प्लेट लावा, नाही तर दंड भरा; १८ फेब्रुवारी डेडलाईन!

वाहनधारकांनो, HSRP नंबर प्लेट लावा, नाही तर दंड भरा; १८ फेब्रुवारी डेडलाईन!


वाहनधारकांनो, HSRP नंबर प्लेट लावा, नाही तर दंड भरा; १८ फेब्रुवारी डेडलाईन!

बीड (एस.एम.न्युज़) - वाहनधारकांनी आपल्या वाहनांना HSRP नंबर प्लेट लावली नाही तर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याकरिता १८ फेब्रुवारी डेडलाईन देण्यात आली आहे.
वाहनधारकांनी जर अजूनही वाहनांना नवीन नंबरप्लेट बसवून घेतली नसेल तर त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) लावण्यासाठी टाळाटाळ करत असाल तर वेळीच सावध होणे आवश्यक आहे. ज्यांनी HSRP नंबरप्लेट लावली नाही, अशा वाहनधारकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. यापूर्वी HSRP नंबर प्लेट लावण्याची अंतिम तारीख ही ३१ डिसेंबर २०२५ देण्यात आली होती. ही तारीख निघून गेल्यानंतरही अनेक वाहनांना HSRP नंबर प्लेट नसल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनात आले आहे. यामुळे आता HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात येणार असून येत्या १८ फेब्रुवारीपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत १००० रुपयांपासून ते १०,००० रुपयांपर्यंतचा दंड वाहनधारकांना भरावा लागू शकतो.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत