Breaking News

पत्रकार रईस खान ‘आफताब-ए-सहाफत’ पुरस्काराने सन्मानित

पत्रकार रईस खान ‘आफताब-ए-सहाफत’ पुरस्काराने सन्मानित

२५ वर्षांच्या पत्रकारितेचा ‘खादिमीन-ए-उम्मत’ कडून गौरव

बीड (एस.एम.न्युज़) - येथील ज्येष्ठ पत्रकार रईस खान सिकंदर खान पठाण यांना खादिमीन-ए-उम्मत या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय प्रतिष्ठित ‘आफताब-ए-सहाफत’ (पत्रकारितेचा सूर्य) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पत्रकारितेतील त्यांच्या २५ वर्षांच्या निष्ठावान, प्रामाणिक व समाजाभिमुख कार्याची दखल घेत नांदेड येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
खादिमीन-ए-उम्मत ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रात  धार्मिक व नैतिक प्रशिक्षणासाठी कार्यरत आहे. संस्थेचे अध्यक्ष आबिद खान पठाण, बीड समन्वयक सय्यद मोहम्मद अली हाश्मी, हजरत नदीम मिर्झा तसेच  अर्शद सिद्दीकी यांच्या विशेष प्रयत्नातून हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी पत्रकारिता क्षेत्रात विश्वासार्हता व प्रतिष्ठा मिळवलेल्या रईस खान यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रसिद्ध धर्मगुरू मुफ्ती कौसर आफाक, राज्य नेते सय्यद मोईन, ॲड. एम. झेड. सिद्दीकी, मुफ्ती गाझी उमैर, ॲड. अब्दुर रहमान सिद्दीकी, डॉ. फैयाज आलम कासमी, मुफ्ती सोहेब खान नदवी, डॉ. चोपदार मोहम्मद शफी, डॉ. मोहम्मद साजिद, शाह मोईनउद्दीन यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
रईस खान यांनी उर्दूसह इतर भाषांमध्येही पत्रकारितेचे कौशल्य सिद्ध केले आहे. त्यांनी औरंगाबाद टाइम्स, दैनिक अल-हिलाल टाइम्स (बीड), दैनिक इन्साफ, दैनिक तामीर, औरंगाबाद सिटीजन्स या वृत्तपत्रांत जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. सध्या ते औरंगाबाद सिटीजन्सचे प्रतिनिधी असून महा टाईम्स डॉट इन आणि बीड इन्साफचे मुख्य संपादक आहेत.तसेच म. रा. मराठी पत्रकार संघाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय सेवेमुळे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत