Breaking News

निवडणूक हे सज्जनांचे क्षेत्र नसले तरी स्वीकृत नगरसेवक पदावर अशा लोकांचा निश्चितच अधिकार असतो - डॉ. सतीश साळुंके

निवडणूक हे सज्जनांचे क्षेत्र नसले तरी स्वीकृत नगरसेवक पदावर अशा लोकांचा निश्चितच अधिकार असतो - डॉ. सतीश साळुंके

*बीड।एस.एम.न्युज़*
बीड जिल्ह्यातील बीड सह गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई, धारूर,परळी या नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून त्या-त्या शहरातील क्रीडा, उद्योग, शिक्षण, पत्रकारिता, न्यायपालिका, संस्कृती, इतिहास, साहित्य व समाजसेवक या क्षेत्रातील मान्यवर नियुक्त करावे. त्यामुळे त्या शहराच्या सर्वांगीण विकासाला खऱ्या अर्थाने हातभार लागेल. स्वीकृत नगरसेवक म्हणजे राजकीय पक्षांनी वाटलेल्या रेवड्या आणि खिरापत नव्हे. या विषयी शासनाने काही नियम निर्धारित केलेले आहेत. त्याचे अनुपालन व्हायला हवे. या संदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असून न्यायालयात रीट दाखल करणार असल्याची माहिती 'सारांश' या पॉडकास्ट चॅनेलचे मुख्य संपादक डॉ. सतीश साळुंके यांनी दिली.
              सर्वच नगरपालिकांमधून सध्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी स्पर्धा सुरू झाली आहे.  राजकीय ॲडजस्टमेंट करण्यासाठी दिलेल्या आश्वासनांमुळे स्वीकृत नगरसेवक विविध राजकीय पक्ष निवडतात असा अनुभव आहे. मात्र स्वीकृत नगरसेवक म्हणून त्या-त्या शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना जर नगरपालिकेत स्थान दिलं तर त्या शहराच्या सर्वांगीण विकासाला मदत होईल. या संदर्भात समाजातील सर्व स्तरातून आवाज उठवण्याची आवश्यकता असून जनतेने निवडून दिलेल्या मतांवर जनतेचाच अधिकार आहे. त्यासाठी या निमित्ताने चांगली माणसे नगरपालिकेत जाणे आवश्यक आहे. बीड नगरपालिकेसाठी पत्रकारितेच्या क्षेत्रातून अशोक देशमुख शिक्षण व न्याय क्षेत्रातून ॲड. कालिदासराव थिगळे, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातून डॉ. दीपाताई क्षीरसागर, राजकीय क्षेत्रातून कॉ. नामदेव चव्हाण, सामाजिक क्षेत्रातून डॉ. गणेश ढवळे, कीडा क्षेत्रातून राष्ट्रीय तायक्वांदो खेळाडू अविनाश बारगजे तर वैद्यकीय क्षेत्रातून प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. इलियासखान यांच्यासारखे मान्यवर स्वीकृत नगरसेवकांच्या रूपात नगरपालिकेत गेली तर महाराष्ट्रातील ते एक अद्वितीय उदाहरण ठरेल व नगरपालिकेच्या व्यवस्थापनावर एक नैतिक अधिकार असेल तसेच बीडच्या सर्वच राजकीय पक्षांची प्रतिमा उंचावेल. त्या-त्या भागातील नेत्यांनीही स्वीकृत नगरसेवकांचा गांभीर्याने विचार करून आपण जनतेचे बांधिल आहोत हे दाखवून द्यावे. निवडणुक हे सज्जनांचे क्षेत्र नसलं तरी स्वीकृत नगरसेवकांवर अशा लोकांचा निश्चित अधिकार असतो. असेही प्रतिपादन डॉ. सतीश साळुंके यांनी केले.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत