Breaking News

'बीड न्यूज आपतक'च्या बेधडक पत्रकारितेचा मान्यवरांकडून गौरव!

'बीड न्यूज आपतक'च्या बेधडक पत्रकारितेचा मान्यवरांकडून गौरव!

दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांची उपस्थिती; सत्याची कास न सोडण्याचे आवाहन

बीड (एस.एम.न्युज़) 
पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते, आणि हा स्तंभ तेव्हाच मजबूत राहतो जेव्हा पत्रकार सत्तेला आणि नेत्यांना थेट प्रश्न विचारण्याचे धाडस करतो. "एक कदम सच की ओर" हे ब्रिदवाक्य घेऊन वाटचाल करणाऱ्या 'बीड न्यूज आपतक' या हिंदी न्यूज चॅनलने अवघ्या दोन वर्षांत ही किमया साधली आहे. चॅनलच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी मुख्य संपादक शेख इमरोज शरीफ यांच्या 'नेत्यांना घाम फोडणाऱ्या' बेधडक पत्रकारितेचे विशेष कौतुक केले.
बीड येथे अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्याला माजी आमदार उषाताई दराडे, संगीताताई वाघमारे, आम्रपाली साबळे, माजी पंचायत समिती सदस्य पठाण फेरोज, समाजसेवक सय्यद फैयाज भाई, ॲड. शेख झेबा, शेख खदीर, नगरसेवक अय्यूब खान, नगरसेवक मोमीन मोहसीन, ग्रामपंचायत सदस्य सय्यद रहीम, ग्रामपंचायत सदस्य सय्यद नदीम मंडोला, ग्रामपंचायत सदस्य सय्यद रिजवान, माजी नगरसेवक सय्यद फारूक, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख इंजि. कृष्णा चौरे, शेख अनिस, गुलरुख ज़हीन बाजी, रेहान बाजी, शिक्षिका शबाना बाजी, सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे, ज्येष्ठ मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़, हाफिज़ मन्सूर, सय्यद साजेद, गुड्डू चाऊस, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, सय्यद सादिक, एसडीपीआय पक्षाचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष सय्यद आबेद, स्टार नॅचरा ग्रुपचे डॉक्टर सेल पदाधिकारी, जिव्हाळा बेघर केंद्राचे अभिजीत वैद्य, डॉ. राजेंद्र सानप, बीड शहर बचाव मंचचे डी.जी. तांदळे, नितीन जायभाय, बाजीराव ढाकणे, नसीर पटेल, पत्रकार एजाज अहेमद , पठाण जावेद यांच्यासह शहरातील अनेक गणमान्य दिग्गजांनी हजेरी लावली.
         यावेळी बोलताना मान्यवरांनी शेख इमरोज शरीफ यांच्या कामाचा गौरव करताना म्हणाले, "सध्याच्या काळात अनेकदा पत्रकार प्रश्न विचारताना कचरतात, पण 'बीड न्यूज आपतक'ची शैली वेगळी आहे. समोर नेता कोणताही असो, कोणताही मुलाहिजा न बाळगणारी आणि थेट, तिखट प्रश्न विचारण्याची या चॅनलची धमक वाखाणण्याजोगी आहे. आपल्या थेट प्रश्नांमुळे चांगल्या चांगल्या नेत्यांना घाम फोडण्याचे काम शेख इमरोज यांनी केले आहे. हीच खरी निष्पक्ष पत्रकारिता आहे. आज समाजाला अशाच निडर पत्रकारांची गरज आहे. पत्रकारांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता अशाच प्रकारे काम करावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत