राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी बीड जिल्ह्याचा संघ घोषित
राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी बीड जिल्ह्याचा संघ घोषित
३१ जानेवारी रोजी राहुरी येथे स्पर्धेचे आयोजन
बीड (एस.एम.न्युज़) - महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असो. मुंबई व इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन मान्यतेने व अहिल्या नगर असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजीक स्पोर्ट्स यांच्या विदयमाने “ज्युनिअर महाराष्ट्र श्री” २०२६ व ( मास्टर्स / दिव्यांग )आणि ज्युनिअर महाराष्ट्र श्री स्पर्धे चे आयोजन शनिवार दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी सांयकाळी ५ वाजता विठ्ठला लान्स राहुरी, जिल्हा अहिल्यानगर येथे करण्यात आलेले आहे. या अनुषंगाने बीड जिल्ह्याचे शरीर सौष्ठव संघ निवड चाचणी स्पर्धा दिनांक १८.१. २०२६ रविवारी सायंकाळी ठिक ६ : ३० वाजता मराठवाडा बॉडी बिल्डर्स असोसिएशन लाईफ हेल्थ कल्ब, लाईफ स्टाईल जिम, महात्मा फुले शॉपींग सेंटर, नवीभाजी मंडई, बीड येथे निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. सदरील स्पर्धेतून मास्टर्स बॉडी बिल्डिंग ५५ ते ६० वर्ष वयोगटात सय्यद हारून शब्बीर हुसेन सिद्दीकी, ज्युनिअर २१ वर्षाखालील वयोगटात फुंदे ज्ञानेश्वर बालासाहेब ( परळी ), तर प्रशिक्षक सय्यद अमानउल्लाह यांची निवड एम बी बी ए, आय बी बी एफ च्या नियमानुसार करण्यात आली आहे. हि स्पर्धा मराठवाडा बॉडी बिल्डर्स असोसिएशन चे सचिव डॉ. सय्यद अरशियानउल्लाह मिसबाहउल्लाह व डॉ. सय्यद मसीह सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या स्पर्धेसाठी शेख शकील मूहम्मद, वेट लिफ्टिंग प्रशिक्षक शेख वसीम सर, जिल्ह्याचे शरीर सौष्ठव खेळाडू, जिम चालक-मालक, ट्रेनर्स मंडळी उपस्थित होते. खेळाडू व प्रशिक्षक सय्यद अमानउल्लाह यांना स्पर्धेचे यशासाठी मराठवाडा बॉडी बिल्डर्स असोसिएशन चे अध्यक्ष आमदार धंनजय मुंडे, कार्याध्यक्ष आमदार विजयसिंह पंडित, जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर, ॲड. शेख शफिक भाऊ, अविनाश नाईकवाडे, विक्रांत हजारी, मुकर्र्म जान पठाण, सय्यद सिराज सर (परळी) यांनी शुभेच्छा दिल्या.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा