नगराध्यक्ष पदासाठी बीडच्या जनतेने निवडावे तरी का? - एस.एम.युसूफ़
नगराध्यक्ष पदासाठी बीडच्या जनतेने निवडावे तरी का? - एस.एम.युसूफ़
शहरातील प्रश्न व समस्या गेल्या चुलीत?
बीड।एस.एम.न्युज़
बीड नगरपरिषद साठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी बीड शहरातील तीन प्रश्नांसाठी मी आवाहन केले होते की, *पोकळ आश्वासनं नको; लिखित वचन देणाऱ्या उमेदवारांनाच निवडून द्या*. ही आव्हानात्मक बातमी वाचून बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांपैकी फक्त आम आदमी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवीत असलेल्या वृषालीताई नितीन जायभाय या एकट्याच पुढे येऊन त्या तीन प्रश्नांसाठी वचननामा देऊन गेल्या. बाकीचे उमेदवार मात्र नामानिराळे राहिले. जे आवाहन जवळपास २० वृत्तपत्रांच्या माध्यमातून समोर आले ते निवडणुकीला उभे राहणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी वाचले नसेल असे होऊच शकत नाही. तरीपण एक वृषालीताई वगळता नगराध्यक्षपदासाठीच्या बाकी उमेदवारांनी वचननामा देणे तर दूर त्यांनी निवडून आल्यानंतर ती तीन कामे करण्यात येतील असे साधे पत्रक सुद्धा काढले नाही. हे पाहता असे दिसून येते की, त्यांना फक्त नगराध्यक्ष पद प्राप्त करून हे पद भूषवून त्या उबदार खुर्चीवर स्थानापन्न व्हायचे आहे बास. बाकी शहरातील प्रश्न व समस्या गेल्या चुलीत, असाच या उमेदवारांचा होरा असल्याचे यावरून दिसून आले. हे उमेदवार जर फक्त तीन प्रश्न सोडविण्याचे वचन देऊ शकत नसतील तर निवडून आल्यावर हे शहरासाठी काय करतील? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून १) खासबाग-मोमीनपुरा हे दोन मोठे भाग जोडण्याकरिता बिंदुसरा नदीवरील नियोजित पुलाचे निर्माण. २) मोमीनपुरा बायपास रोड लगत असलेल्या महेदवीया दायरा कब्रस्तानच्या संरक्षक भिंतीचे निर्माण आणि ३) ऐतिहासिक कारंजा टॉवर चे परिपूर्ण नूतनीकरण व सुशोभीकरण. या तीन प्रश्नांसाठी नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारांकडून वचननामा मागितला होता परंतु वृषालीताई नितीन जायभाय यांच्या व्यतिरिक्त इतर एकही उमेदवार वचननामा घेऊन फिरकला तर नाहीच, या मुद्द्यावर साधे प्रसिद्धी पत्रक सुद्धा काढले नाही. हे पाहता निवडणूक लढवीत असलेल्या उमेदवारांना सामाजिक व लोकप्रश्नांचे किती गांभीर्य आहे हे सहजच दिसून आले. ही परिस्थिती पाहता नगराध्यक्ष पदासाठी बीडच्या जनतेने निवडावे तरी का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
*लेखन - एस.एम.युसूफ़*
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा