Breaking News

प्रभाग क्रमांक १४ पंचशील नगर मधून राज ठाकरे यांचा एकनिष्ठ शिलेदार उतरणार निवडणुकीच्या मैदानात

प्रभाग क्रमांक १४ पंचशील नगर मधून राज ठाकरे यांचा एकनिष्ठ शिलेदार उतरणार निवडणुकीच्या मैदानात

आदर्श तरकसे यांचा विजय निश्चित 

बीड (एस.एम.न्युज़) – गेल्या १० वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठतेने राहिलेले तसेच सर्वसामान्यांसाठी अडीअडचणीच्या वेळेत धावून येणारे व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित असलेले आदर्श तरकसे हे बीड नगर परिषद च्या येत्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १४ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे त्यांचे कार्य आणि एकनिष्ठतेमुळे त्यांचा या प्रभागात मोठ्या मताधिक्याने विजय होईल असे या प्रभागातील मतदार स्वतः बोलत आहेत.
आदर्श तरकसे हे सन २०१४ सालापासून म्हणजेच गेल्या ११ वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत कार्यरत आहेत. मनसेत सक्रियपणे काम करत असताना त्यांनी प्रभागातील नागरिकांच्या समस्यांसाठी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात काम केले आहे. त्यांच्या या कार्याचे फळ म्हणून त्यांना पक्षातर्फे या प्रभागातून उमेदवारी मिळणार आहे या प्रभागातून त्यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. सर्वसामान्य मतदारांसह आदर्श तरकसे यांचे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष, अशोक भाऊ तावरे, जिल्हाध्यक्ष सुमंत धस, जिल्हा उपाध्यक्ष, सदाशिव बिडवे, जिल्हा सचिव सोमेश्वर कदम, शहराध्यक्ष अमरजान पठाण, शेतकरी मनसेनेचे जिल्हाध्यक्ष, रामेश्वर साळुंके, बंडू जमदाडे, विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष शैलेश जाधव, महिला सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षा वर्षाताई जगदाळे या सर्वांसोबत सलोख्याचे व मजबूत संबंध आहेत या सर्वांच्या नेतृत्वाखाली ते पक्षाची भूमिका आणि पक्षाचे कार्य गेल्या ११ वर्षांपासून मतदारांमध्ये चांगलेच बिंबवून सांगतात. शिवाय तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या हाकेला ओ देऊ धावून जात असल्याने त्यांच्याविषयी मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात एक प्रकारची आत्मीयता आहे. यामुळेच प्रभाग क्रमांक १४ पंचशील नगर मधून त्यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत