Breaking News

प्रभाग क्रमांक ६ मधून ज़ैद कादरी तुतारी कडून इच्छुक; मतदारांचीही मागणी

प्रभाग क्रमांक ६ मधून ज़ैद कादरी तुतारी कडून इच्छुक; मतदारांचीही मागणी

बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील जुना बाजार सह इतर वसाहतीचा प्रभाग क्रमांक सहा मधून शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तुतारी या चिन्हावर निवडणूक लढविण्यास सामाजिक कार्यकर्ते ज़ैद कादरी इच्छुक असून या प्रभागात राहणाऱ्या मतदारांनीही त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी लावून धरली आहे.
ज़ैद कादरी हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत सर्वसामान्यांसाठी ते वेळी अवेळी धावून जातात जिल्हा रुग्णालय, पोलीस ठाणे, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, महावितरण कार्यालय असो की अन्य कोणतेही शासकीय-प्रशासकीय कार्यालय अडल्या-नडलेल्यांची कामे करण्यासाठी ते सदैव पुढाकार घेतात. याकरिता मतदारांमध्ये त्यांच्याविषयी मोठ्या प्रमाणात आपला हक्काचा माणूस म्हणून भावना आहे. अशा व्यक्तीला जर हक्काचे नगरसेवक पद मिळाले तर त्यांच्याकडून समाजासाठी मोठ्या प्रमाणात कामे होतील अशी आशा आणि अपेक्षा मतदारांमध्ये आहे. त्यांना बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप भैय्या क्षीरसागर आणि माजी आमदार सय्यद सलीम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तुतारी या चिन्हाची उमेदवारी द्यावी अशी मागणी मतदारांकडून करण्यात येत असून त्यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा विजय निश्चित असल्याचेही मतदार बोलून दाखवत आहेत. आणि जर त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी असेही मतदारांकडून म्हटले जात आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत