Breaking News

चुकीच्या उपचारामुळे चिमुकलीचा मृत्यू; कोवळी कळी अकाली कोमेजली!

चुकीच्या उपचारामुळे चिमुकलीचा मृत्यू; कोवळी कळी अकाली कोमेजली!

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कारवाईकडे लक्ष    

शिरूर (एस.एम.न्युज़) - शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका तेरा वर्षीय मुलीचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणा आणि चुकीच्या उपचारांमुळे मृत्यू झाल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे केली असून या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत दवाखाना बंद ठेवण्याची मागणी देखील केली आहे. या घटनेनंतर जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कारवाईकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
या संदर्भात मुलीचे वडील संजय रामनाथ बारगजे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, माझी मुलगी संस्कृती हिला उपचारासाठी शहरातील डॉ. प्रशांत ढाकणे यांच्या गुरुदत्त हॉस्पिटल मध्ये एक नोव्हेंबर रोजी आणले होते. यावेळी डॉ. ढाकणे यांनी मुलीवर उपचार करून तिला तीन दिवसांचा सलाईनचा कोर्स करण्याचे सांगितले. त्यानुसार संजय बारगजे यांनी तिला दोन दिवस सलाईन दिले. परंतु तीन नोव्हेंबर रोजी रात्री एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान मुलीला त्रास सुरू झाल्यानंतर त्यांनी डॉ. ढाकणे यांच्याकडे उपचारासाठी आणले. त्यावर डॉ. ढाकणे यांनी एक सलाईन आणि काही इंजेक्शन दिल्यामुळे मुलीची तब्येत खालावली त्यावरून तिला पुढील उपचारासाठी बीडला घेऊन जाण्याचे डॉक्टरांनी सांगितले. या वेळी मुलीला अचानक काय झाले असे विचारले असता डॉक्टरांनी काही एक उत्तर दिले नाही. मुलीला बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मुलगी मयत झाल्याचे सांगितले. चुकीचे उपचार आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आमची मुलगी संस्कृती हिचा मृत्यू झाला असून तिच्या मृत्यूला गुरुदत्त हॉस्पिटलचे डॉ.प्रशांत ढाकणे हे जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करून या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत हॉस्पिटल बंद ठेवण्याची मागणी देखील जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे वडील संजय रामनाथ बारगजे यांनी केली असून या घटनेत चुकीच्या उपचारामुळे चिमुकलीचा मृत्यू झाल्याने संस्कृती नावाची कोवळी कळी अकाली कोमेजली आहे. या घटनेनंतर जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक काय कारवाई करतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.    
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत