Breaking News

दुष्काळात १३वा नव्हे ओल्या दुष्काळाचा ७वा महिना

यंदा पावसाळा झाला सहा महिन्यांचा; तरीही उकाडा कमी होईना

लोकांना आता हिवाळ्याची प्रतीक्षा 

बीड (एस.एम.न्युज़) - कधी नव्हे ते यंदा प्रथमच मे महिन्यापासून सुरू होऊन ऑक्टोबर महिना संपून ही पाऊस पडतच आहे. पावसाळा सुरू होऊन चक्क सहा महिने झाले आहे. गेल्या सहा महिन्यांत सरासरीपेक्षा अत्यंत जास्त प्रमाणात पाऊस पडला आहे. नुकताच ऑक्टोबर महिना संपला नोव्हेंबर सुरू झाला असला तरी पाऊस मात्र थांबलेला नाही. काल २ नोव्हेंबर तरी सुद्धा पाऊस पडला. थोड्या-थोड्या दिवसाच्या खंडाने तो सतत पडतच आहे. जास्तीच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी रक्ताचे घाम करून केलेली पेरणी आणि पिके मोठ्या प्रमाणात वाया गेली आहेत. यामुळे शेतकरी बांधवांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता नोव्हेंबर महिना सुरू झाला असला तरीही अजूनपर्यंत या काळात पडावी तशी हिवाळ्याची थंडी पडत नाहीये. मात्र सहा महिन्यांपासून सातत्याने पाऊस पडूनही वातावरणातील उकाडा काही केल्या कमी व्हायला तयार नाही. अशा अवस्थेत आता लोकांना हिवाळ्याच्या थंडीची प्रतीक्षा लागली आहे.
गेल्या काही काळापासून वर्षातून चार ऐवजी जेमतेम अडीच ते तीन महिने पाऊस पडत होता. उर्वरित नऊ-साडेनऊ महिन्यात तीन महिने हिवाळा तर बाकीचे सहा-साडेसहा महिने उन्हाळा असायचा. निसर्गात प्रत्येकी चार महिने असणाऱ्या ऋतूमध्ये अशा प्रकारे बदल झालेला होता. यानुसार लोकांना अनेक वर्षांपासून याची सवय झालेली होती. मात्र यंदा ऋतुमानामध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल झाला आणि मे महिन्यापासून ते आतापर्यंत ऋतुमानात बरेच काही उलटसुलट घडले. यात यावर्षी मे महिन्यापासून पावसास सुरुवात झाली, तेव्हा लोकांनी अवकाळी म्हणून याकडे पाहिले. मे महिना संपून जून सुरू झाला तसा पावसाने अजून जोर धरला आणि जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर असे पाहता पाहता सहा महिने सरले सातवा महिना सुरू होऊनही पाऊस पडतच आहे. अति झालेल्या पावसामुळे यावेळी मोठे आर्थिक नुकसान तर झालेच शिवाय अनेक पिके वाया गेली आहेत. आता नोव्हेंबर पासून तरी पाऊस थांबेल, हिवाळा सुरू होईल आणि शेतकरी बांधव गहू, ज्वारी सह इतर भाजीपाला वगैरे चे पीक घेऊ शकतील या आशेवर लोक आहेत. आता पाऊस थांबला पाहिजे. वातावरणातील उकाडा शमला पाहिजे आणि हिवाळा सुरू व्हायला पाहिजे. या प्रतीक्षेत शेतकरी बांधवांसह सर्व लोक आहेत.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत