Breaking News

चार वर्षीय ज़िकरा ज़ाकेर शेख अरबी मध्ये विशेष प्राविण्‍याने उत्तीर्ण

चार वर्षीय ज़िकरा ज़ाकेर शेख अरबी मध्ये विशेष प्राविण्‍याने उत्तीर्ण

बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील प्रसिद्ध अंबर फॅमिली रेस्टॉरंट चे संचालक ज़ाकेर शेख यांची चार वर्षीय कन्या ज़िकरा ही अरबीमध्ये विशेष प्राविण्‍याने उत्तीर्ण झाली. याबद्दल तिचे स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.
ज़िकरा शेख अरबी भाषेतून शिक्षण घेत आहे. नुकतीच तिची परीक्षा झाली. यात तिने चांगले गुण घेतले. परीक्षेत विशेष प्राविण्‍याने उत्तीर्ण होणारे विद्यार्थी व विद्यार्थिनींना कारंजा मस्जिद येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात हाफ़ीज़ साद यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यात ज़िकरा ज़ाकेर शेख हिचे ही स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी शिक्षक वृंदांसह विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत