Breaking News

सालेहा मझहर शेख चा विवाह सोहळा थाटात साजरा


अनेक वर्षांनी एकत्र आले सर्व जिवलग मित्र

सालेहा मझहर शेख चा विवाह सोहळा थाटात साजरा 

बीड (एस.एम.न्युज) - शहरातील नामांकित व्यक्तिमत्व तथा गजानन नागरी सहकारी बँकेतील विशेष वसुली अधिकारी मझहर कय्युम शेख यांची कन्या सालेहाचा विवाह वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील रहिवाशी मुहम्मद अजीम यांचे पुत्र मुहम्मद असीम सोबत बीड शहरातील तेलगाव रोड स्थित कोहिनूर लॉन्स येथे दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ गुरुवार रोजी संध्याकाळी मोठ्या थाटात साजरा झाला. यानिमित्ताने मझहर शेख यांचे बालपणापासूनचे सर्व जिवलग मित्र आवर्जून विशेष उपस्थित राहिले. 

यात जिल्हा रुग्णालयातील फार्मासिस्ट मीर एजाज अली उस्मानी, सीआयएसएफ चे सेवानिवृत्त जवान शेख फारुख, घाटी रुग्णालयातील लॅब असिस्टंट शेख जमील, सहशिक्षक शेख नजीर, जिल्हा रुग्णालय कर्मचारी शेख शकील, पुणे येथे स्थायिक झालेले व्यवसायी सय्यद मोईन, अहेमदनगर जिल्ह्यात कर्तव्यावर असलेले पोलीस निरीक्षक मुख्तार खान पठाण, सहशिक्षक शेख कलीमोद्दीन आणि मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ यांनी सालेहाच्या लग्नाप्रित्यर्थ आपल्या या जिवलग मित्र व वधू-वरासह संपूर्ण शेख कुटुंबीयांना भरभरून शुभेच्छा दिल्या.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत