Breaking News

*निवडणूक लागली - आरसा दाखवा*



निवडणूक लागली - आरसा दाखवा


*ताई, माई,अक्का, यावेळी खरा विचार करा पक्का !*

*भिकार - भणंगांना सोडा निष्ठावंतांना मारा शिक्का !!*

*मंदिर,मस्जिद, गिरजाघर, गुरुद्वारें*
*और बुद्ध विहार अब सजने लगे है !*

*चंद दिनो मे इलेक्शन आ चुके*

 *ढोल, ताशे, नगारे बजने लगे है !!*

*फरेबी और झुटे,मक्कारों की फौज निकल पडी है मैदानों मे*

*हम ही तो है तुम्हारे रहनुमां, सभी के बोल बजने लगे है !!*

सध्या महाराष्ट्र राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत, ज्यांना कोणी ओळखत देखील नाही अशा काही हौशे, नवशे, गवशांनी मोठी भाऊगर्दी केली आहे, गल्ली - बोळातील शेंबडे, चोर - उचक्के, दारुडे, चर्सुंडे देखील पुढारी म्हणवत स्वतःला मिरवून घेत आहेत.
त्यांना आपल्या स्वतःचे घर, कुटुंब, नातेवाईक आणि मित्र मंडळ परिवाराची मते पडणार का ? याची शाश्वती नाही, कारण ज्यांना कोणी ओळखतच नाही, ज्यांचे काही अस्तित्वच नाही, ती मंडळी आता भावी नगरसेवक, भावी जिल्हा परिषद सदस्य होण्याचे स्वप्न पाहू लागले आहेत. परंतु प्रत्यक्षात यांचे कार्य काय आहे ? यांनी आजपर्यंतच्या कालावधीत कोणते सामाजिक कार्य केले ? याचा सर्वात आधी त्यांनी अभ्यास करायला नको काय? मगच नगरपालिका किंवा जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याचा निर्णय घ्यायला हवा, परंतु आपलं कवडीचेही सामाजाभिमुख कार्य योगदान नसताना केवळ उड्या मारून शेवटी काय साध्य करणार ? 
सामाजाभिमुख कार्य करताना त्या कार्यातून मनुष्याची ओळख होते. पुढे त्याची सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण होते आणि पुढे राजकारणात त्याचा फायदाही होतो, मात्र आयुष्यात असे कोणतेच सामाजिक कार्य केलेले नसताना त्यावर ज्यांना कवडीची देखील अक्कल नसताना पावसाळ्यातील भुईछत्र्या प्रमाणे यांचा अचानक उगम होवून आता ते मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास उत्सुक झाले आहेत, परंतु इतके दिवस विशेषतः कोरोना संकटसमयी ज्याप्रसंगी प्रत्येकालाच मदतीची नितांत गरज होती त्यावेळी हे महाभाग कोणत्या बिळात लपून बसले होते ? हल्ली राजकारणाने एक वेगळे वळण घेतले आहे. सध्या राजकारणाने खुपच खालची पातळी गाठली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शहराच्या अनेक प्रभागामध्ये जनसामान्यांच्या मुलभूत समस्यांचं निवारण देखील झालेले नाही, त्यांचे प्रश्न व समस्या सोडवण्यात आलेल्या नाहीत, अशात ज्यांना कवडीची देखील अक्कल नाही ते आता प्रभागा मध्ये काय दिवे लावणार ? 
प्रत्येक वेळी निवडणुका आल्या की भोळ्या-भाबड्या मतदार बंधू-भगिनींना खोट्या भूलथापा देऊन तसेच त्यांना खोटेच आश्वासने देऊन त्यांचा कायम फायदा घेण्यात आला परंतु यावेळेस मात्र मतदार बंधू भगिनी सावध आणि जागरुक झालेले आहेत. कोण आपले प्रश्न सोडवू शकतात ? कोण भूल थापा देऊ शकतात ? हे सर्वांना कळून चुकलेले आहे. आता हल्लीचा जागरुक मतदार कुणाच्या भूलथापांना बळी पडणार नाही. यावेळी मतपेटीतून लबाड पुढाऱ्यांना त्यांची योग्य जागा दाखवून देणारच यात तीळ मात्र शंका नाही.

काही पुढारी स्वतःच्या (अनियतीतून कमावलेल्या) कमाईतून निवडणुका लढविणार की, बाप कमाईतून ? निवडणूका लढणार असा देखील जनतेसमोर प्रश्न उभा ठाकला असला तरी संधी साधू पुढाऱ्यांच्या भाऊगर्दी मुळे आज प्रत्येक गांव शहरातील "मंदिर, मस्जिद, गिरजाघर, गुरुद्वारें आणि बुद्ध विहार अब सजने लगे है !
"चंद दिनो मे इलेक्शन आ चुके, ढोल, ताशे, नगारे बजने लगे है !!, 'फरेबी और झुटे,मक्कारों की फौज निकल पडी मैदानों मे, हम ही तो है तुम्हारे रहनुमां, सभी के बोल बजने लगे है !!" अशा प्रकारे सर्वधर्मीय प्रार्थना स्थळांपासून ते गल्ली बोळांपर्यंत लबाड पुढाऱ्यांद्वारे मतदार राजांचे उंबरे झिजवणे सुरु झाले आहे.
उठ सूट कोणीही राजकारण करण्याअगोदर सामाजिक कार्य करणे महत्त्वाचे आहे. त्यातून समाजात ओळख निर्माण होते. याचा अगोदर उड्या मारणाऱ्या भावी नगरसेवक, भावी जिल्हा परिषद सदस्य यांनी अभ्यास केला पाहिजे असे परखड मत प्रभागातील मतदार बंधू - भगिनी व्यक्त करत आहेत. एक मत अत्यंत अनमोल आहे. याची जाणीव मतदार बंधू भगिनींना झालेली आहे. तेव्हा कोणी कितीही आश्वासनांचा गाजर दाखवण्याचा प्रयत्न करून स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न केल्यास त्यास तोंडघशी पडावे लागणार आहे.
सर्वप्रथम ज्या-ज्या प्रभागांमध्ये जनसामान्य नागरीकांच्या मुलभूत सुविधा, समस्या, रस्ते, पाणी, वीज अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात अकार्यक्षम असल्याच्या  तक्रारी वाढल्याने काही अकार्यक्षम नगरसेवकांनी आता तर प्रभाग क्रमांक बदलून इतर प्रभाग क्रमांकात प्रवेश करत असल्याचे देखील सामोरे येत आहे. आपल्या पुर्वीच्या जुन्या प्रभागा मध्ये सामाजाभिमुख कार्याचे गेल्या पाच वर्षात कोणतेच दिवे लावू शकले नाही ते आता नव्या प्रभागात काय दिवे लावणार ? याकरिता जागृत मतदार बंधू-भगिनींनी मतदान करताना सर्वप्रथम आपल्या समस्या सोडविण्यात निवडणुकी अगोदर जो सक्षम असेल त्यालाच मतदान करावे. इतरांच्या भूलथापांना बळी पडून चिरीमिरी घेऊन काही साध्य होणार नाही, पाच वर्ष पुन्हा पश्चचतापाशिवाय काहीच उरणार नाही. आपण निवडून दिलेला नगरसेवक निवडून आल्यावर आपल्या प्रभागामध्ये लवकर फिरकणार नाही हा आजपर्यंतचा इतिहास आहे. हे कुणालाही उद्देशून म्हटलेले नसून कुणी वैयक्तिकरित्या घेऊ नये, मला माझे मत परखड मांडण्याचा अधिकार असल्याने ते मी सर्वसामान्य मतदार बंधू भगिनी यांच्या माहितीसाठी माझे परखड मत मांडले आहे. त्यात गैर ते काय?  म्हणून "ताई - माई, अक्का, यावेळी खरा विचार करा पक्का !,भिकार - भणंगांना सोडा,निष्ठावंतांना मारा शिक्का !!

*लेखन - लियाकतखान पठाण*
(संपादक - सा.खरे सव्वाशेर, संगमनेर)
*संपर्क - 9665282010*

 ⭐इन साईड⭐

*दर्जेदार लेखणीचे माहेरघर*

बातमी असो की निवेदन

दर्जेदार लिहून पाहिजे तर अवश्य भेटा 

वाजवी दरात उत्कृष्ट लेखन -

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)

आसेफ़नगर, बीड 

संपर्क - *9021 02 3121*

---------------------

*जे अँड सन्स गारमेंट्स*

(शर्टींग, शूटिंग, टेलरिंग)

यंग जनरेशनच्या पसंतीचे अद्यावत दालन

समर्थ लॉन्स कॉम्प्लेक्स, अहेमदनगर रोड, बीड.

प्रोप्रायटर - *जावेद फारुकी*

संपर्क - *9881323372*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत