काँग्रेसचे शेख मोहसीन जनतेचे खरे सेवक
काँग्रेसचे शेख मोहसीन जनतेचे खरे सेवक
प्रभाग क्रमांक ११ मधून जनतेने संधी द्यावी
बीड (एस.एम.न्युज़) - शहराच्या बालेपीर भागात असलेल्या प्रभाग क्रमांक ११ मधील राष्ट्रीय काँग्रेसच्या निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभागाचे बीड जिल्हाध्यक्ष असलेले शेख मोहसीन बुऱ्हानुद्दीन हे गेल्या आठ वर्षांपासून सर्वसामान्य जनतेसाठी झटून करत असलेली कामे पाहता तेच जनतेचे खरे जनसेवक असल्याचे दर्शविते. यामुळे त्यांना बीड नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभागातील मतदार नगरसेवक केल्यावाचून राहणार नाही. ही निवडणूक त्यांच्यासाठी जनतेनेच हातात घेतली आहे.
गेल्या आठ वर्षात शेख मोहसीन यांच्या कार्याचा आलेख हा सतत उंचावत राहिला आहे. सुरुवातीला सामाजिक कार्यकर्ता व नंतर काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी म्हणून त्यांनी आतापर्यंत प्रभाग क्रमांक ११ मध्ये अनेक समाजपयोगी कामे केली आहेत. ज्यामुळे नागरिकांच्या अनेक अडीअडचणी दूर झाल्या आहेत. मोहसीन हे गेल्या पाच वर्षांपासून उन्हाळ्यात नागरिकांसाठी पाणपोई सुरू करतात. कोविड काळात गरजू गोरगरिबांना खिचडी वाटप, किराणा किट वाटप तर केलेच शिवाय कोविड वॅक्सिनचे कॅम्प ही घेतले. प्रत्येक वर्षी मतदारांची नाव नोंदणी मतदार यादी मध्ये करून घेतात. श्रमिकांना ई-श्रम कार्ड बनवून देतात. गरजूवंतांची संजय गांधी, श्रावण बाळ या योजनेत नावे समाविष्ट करायला लावून याचा लाभ त्यांना मिळावा यासाठी सातत्याने झटतात. वेळप्रसंगी आंदोलने ही करतात. आतापर्यंत त्यांनी विविध विषयांवर आंदोलने केली आहेत. सामाजिक कार्य करत असतानाच राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश करून निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभागाचे जिल्हाध्यक्ष पद मिळाले. या पदाचाही जनतेला कसा लाभ होईल, याकडे सातत्याने लक्ष देतात. काँग्रेस पक्षप्रवेशापासून आतापर्यंत ते सातत्याने हात से हात जोडो अभियान राबवतात. याचा जनतेसह पक्षालाही लाभ होतो. पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्ताने गोरगरिबांना मोफत जेवण देतात. राष्ट्रीय काँग्रेस चे नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेत सुद्धा ते सहभागी होते. जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा होऊन रुग्णांना त्रास होऊ नये, याकरिता ईद-ए-मिलादुन्नबी निमित्ताने दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करतात. दिवस असो की रात्र जनतेच्या आवाजाला धावून येतात. जिल्हा रुग्णालय, तहसील कार्यालय, नगर परिषद, पोलीस ठाणे किंवा अन्य कोणतेही शासकीय-प्रशासकीय कार्यालय असो जनतेच्या कामासाठी, अडीअडचणी सोडविण्यासाठी ते सदैव तयार असतात. प्रभागातील रस्ते, नाल्या आणि विजेच्या प्रश्नासाठी ते सातत्याने नगरपरिषद आणि महावितरण कंपनीकडे संपर्क साधून स्वच्छता मोहीम राबवितात. पथदिवे लावून घेतात. यावेळी मतदारांनी संधी दिल्यास नगरसेवक म्हणून बीड नगर परिषदेकरवी प्रभाग क्रमांक ११ मध्ये प्रभागातील नागरिकांसाठी असलेल्या ओपन स्पेस मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणणे, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शनर पार्क बनविणे, याशिवाय प्रभागाला पाली आणि माजलगाव धरणाचे पाणी कमीत कमी चार दिवसाआड मिळण्यासाठी प्रयत्न करणे, या कामांवर त्यांचे विशेष लक्ष राहणार आहे. सर्वसामान्यांसाठी अहोरात्र झटणाऱ्या या जनसेवकाला प्रभागातील मतदार यावेळी निवडणुकीत नगरसेवक केल्याशिवाय राहणार नाही, असे एकंदरीत चित्र आहे. बीड नगर परिषदेत नगरसेवक म्हणून अशा व्यक्तिमत्त्वाची नितांत गरज आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा