शाळा आणि शिक्षणाची गोडी सफा ने बालपणीच दाखवली अंगणवाडी ताईंनी सफा सह आजीच्या केलेल्या सत्काराची सर्वत्र चर्चा
शाळा आणि शिक्षणाची गोडी सफा ने बालपणीच दाखवली
अंगणवाडी ताईंनी सफा सह आजीच्या केलेल्या सत्काराची सर्वत्र चर्चा
बीड (एस.एम.न्युज़) - आपल्याकडे एक म्हण आहे 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' ही म्हण कागज़ी दरवाज़ा येथे आजोळ असणाऱ्या बार्शी च्या सफा मोमीन या तीन वर्षीय चिमुकलीने दाखवून दिले. यामुळे तिचे तिच्या आजीसह अंगणवाडी ताईंकडून हार, पुष्पगुच्छ आणि मिठाई देऊन सत्कार करण्यात आले. याची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.
बीड शहरातील कागज़ी दरवाज़ा परिसरात राहणारे फरीदा-मुसा शेख यांची मोठी मुलगी फरहिन शेख ही बार्शी येथील महेदवी नगर येथे सासरी राहते. ती चार महिन्यांपूर्वी दुसऱ्या बाळंतपणासाठी आई-वडिलांकडे बीड येथे आली होती. इथे आल्यानंतर तिची तीन वर्षीय मुलगी सफा समीर मोमीन हिने आजीला विचारले 'नानी यहाँ अंगणवाडी है क्या? यावर त्यांनी 'है ना, क्यूँ? असा प्रश्न केल्यावर तिने सांगितले 'मै हमारे वहाँ के जैसा यहाँ भी अंगणवाडी मे जाऊंगी' आणि तिने आजीकडे अंगणवाडीत जायची जिद्द केली म्हणून आजी फरीदा यांनी तिला दुसऱ्या दिवशी कागज़ी दरवाज़ा येथील अंगणवाडीत नेले. तेव्हा तिने आजीला सांगितले, 'अब तुम घर कू जाओ, छुट्टी होते वक्त लेने कू आओ' आणि अशाप्रकारे सफा येथील अंगणवाडी मध्ये गेल्या चार महिन्यांपासून न चुकता, एकही खाडा न करता दररोज गेली. थोडे लिहिणे-वाचणे ही शिकली. आता तिची आई फरहिन दुसरी प्रसूती होऊन दीड महिना झाल्यामुळे बार्शी ला सासरी जाणार असल्याने आता उद्यापासून सफा अंगणवाडीत येणार नाही असे अंगणवाडी ताईंना सफाच्या आजी फरीदा यांनी सांगितल्याने चार महिन्यांपासून दररोज न चुकता अंगणवाडीत येणारी सफा आता उद्यापासून आपल्याकडे येणार नाही म्हणून अंगणवाडी ताई नफीस रहीम यांनी अंगणवाडी सेविका तसेच सर्व अंगणवाडी मधील मुलांमुलींसमोर सफा चे पुष्पहार घालून, मिठाई देऊन तर तिच्या आजी फरीदा यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कारित केले. पाहता पाहता ही वार्ता परिसरात पसरल्याने याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा