ऐतिहासिक कारंजा टॉवरच्या लढ्यास मनसेचे समर्थन
बीड शहराची ओळख असलेले ऐतिहासिक कारंजा टॉवर परिपूर्ण नूतनीकरणासाठी गेल्या १० वर्षांपासून प्रतीक्षेत आहे. मात्र शासन-प्रशासनाच्या उदासीनतेमुळे याकडे गेल्या १० वर्षात ही गांभीर्याने पाहिले गेले नाही. यामुळे एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेशराव गंगाधरे यांनी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, तहसीलदार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक या सर्व अधिकाऱ्यांना कारंजा टॉवर चे नूतनीकरण परिपूर्ण करण्यात यावे म्हणून निवेदन देण्यात आले आहे. याला आता १५ दिवसांचा कालावधी उलटला असून सुद्धा अजूनही प्रशासनिक स्तरावर दखल घेण्यात न आल्याने जोपर्यंत ऐतिहासिक कारंजा टॉवर ची दुर्दशा दूर केली जात नाही, नूतनीकरण परिपूर्ण केले जात नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील असा प्रण एस.एम.युसूफ़ आणि रमेशराव गंगाधरे यांनी केला आहे. याची दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे बीड जिल्हा उपाध्यक्ष सदाशिवराव बिडवे आणि बीड शहराध्यक्ष अमरजान पठाण यांनी घेऊन एस.एम.युसूफ़ आणि रमेशराव गंगाधरे यांचा सत्कार कारंजा टॉवर समोर आयोजित केला होता. काही अपरिहार्य कारणास्तव रमेशराव गंगाधरे सत्काराला उपस्थित राहू शकले नाही. यावेळी सय्यद शराफत, हरिभाऊ अपसिंगेकर, शेख सईद, शेख रियाज, अन्वर बागवान, फेरोज खान आदींची उपस्थिती होती.
*महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव सोबत*
सत्कार प्रसंगी बोलताना सदाशिवराव बिडवे आणि अमरजान पठाण यांनी म्हटले की, कारंजा टॉवर ही फक्त बीड शहराचीच नाही तर जिल्ह्याची ऐतिहासिक ओळख आहे. याला वाचविण्यासाठी प्रयत्न करणारे युसूफ़ भाई आणि रमेश मामा यांच्यासोबत मनसे सदैव तयार आहे. वेळप्रसंगी आंदोलन ही करू.
*जनता एकत्र आल्यास फलनिष्पत्ती होते - युसूफ़*
निवेदन दिल्यानंतर कारंजा परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसह तरुणांमध्ये कारंजा टॉवर विषयी मोठ्या प्रमाणात जागरूकता आली आहे. येथील नागरिकही कारंजा टॉवर साठी आपापल्या स्तरावर कार्य करीत आहेत. जेव्हा जनता एकत्र येते तेव्हा चांगली फलनिष्पत्ती होते, असे सत्कार प्रसंगी बोलताना एस.एम.युसूफ़ यांनी म्हटले.
==============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*



कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा