उर्दू साहित्यकारांनी राष्ट्रवाद मजबूत केले - सरफराज़ शेख साहित्याच्या माध्यमातून नकारात्मक लिखाणाचे उत्तर देत चला - अय्यूब नल्लामंदू
उर्दू साहित्यकारांनी राष्ट्रवाद मजबूत केले - सरफराज़ शेख
साहित्याच्या माध्यमातून नकारात्मक लिखाणाचे उत्तर देत चला - अय्यूब नल्लामंदू
सोलापूर (एस.एम.न्युज़) - इदार ए इस्लामी हिंद व सोशल महाविद्यालय च्या वतीने आयोजित बहुभाषिक साहित्य चर्चा सत्र पत्रकार, समिक्षक सरफराज़ शेख यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य परिषद चे सचिव अय्युब नल्लामंदू यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले. दरम्यान या चर्चासत्रात बोलताना दोन्ही विचारवंतांनी वरील उद्गार काढले.
या चर्चा सत्रात डॉ. राजेंद्र वडजे, डॉ. देविदास गायकवाड, डॉ. भगवान आदटराव, प्रा. सुभाष शास्त्री यांनी आपले विचार व्यक्त करत साहित्याच्या विविध पहलू वर चर्चा करून साहित्य हे समाज प्रबोधनाचे माध्यम आहे. भाषा कोणतीही असो, ती समाज जोडण्याचे महत्वाचे काम करत असते म्हणून यावर अधिक काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक अय्यूब नल्लामंदू यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले कि, साहित्यात समाजाचे प्रतिबिंब दिसत असते. ते प्रतिबिंब स्वच्छ दिसले पाहिजे. साहित्यकाराचे लिखाण हे ऐतेहासिक समजले जाते. म्हणून लिहिताना कोणाची भावना दुखविण्याचे पाप करू नये. जे कोणी नकारात्मक लिखाण करत असेल तर त्याचे प्रेमपूर्वक उत्तर देण्याची आज गरज आहे. प्रेम पूर्वक दिलेल्या उत्तराने गैरसमज दूर होतात. आपले अस्तित्व टिकुन राहते असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष इतिहासकार सरफराज़ शेख यांनी इतिहासाचे अनेक संदर्भ देत म्हटले की, इंग्रजांनी आपल्या देशात "तोडो फोडो" नीतीचा वापर करून देशाच्या एकात्मतेला मलीन केले हे सर्व जग जाहीर आहे. आज प्रयेक धर्माला एकतेची गरज आहे. सर सय्यद अहमद खां व इतर उर्दू साहित्यकारांनी देशात एकात्मता निर्माण करत राष्ट्रवाद मजबूत केले आहे हे विसरता येत नाही. भाषा टिकली पाहिजे. भाषा संपली की सांस्कृती संपते, संस्कृती संपली तर आपण कोण? आपले अस्तिव काय? असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून भाषेचे जतन करणे जरूरी आहे असे विचार मांडले.
चर्चासत्रात प्रा.डॉ. शफी चोबदार, शफीक काजी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सुत्र संचालन व आभार प्रदर्शन प्रा. रईसा मिर्जा यांनी केले. यावेळी डॉ. सलीम खान, डॉ. मकबूल अहेमद, डॉ. इस्माईल शेख, शफीक काजी, इक्बाल बागबान, वायज सय्यद, मन्नान शेख, नजीर मुन्शी, महेमूद नवाज, हसीब नदाफ, बशीर परवाज, असरार नल्लामंदू , सरदार नदाफ, म. हुसेन बक्षी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा