Breaking News

काझी मुजीबुर रहेमान यांचा प्रदिर्घ शैक्षणिक सेवेबद्दल सत्कार


काझी मुजीबुर रहेमान यांचा प्रदिर्घ शैक्षणिक सेवेबद्दल सत्कार

मा.आ.सिराजोद्दीन देशमुख यांनी केले सन्मानित

बीड (एस.एम.न्युज़) - नॅशनल उर्दू प्राथमिक शाळेचे सहाय्यक शिक्षक काझी मुजीबुर रहेमान यांच्या नॅशनल उर्दू प्राथमिक शाळेत ३२ वर्षांच्या सेवेबद्दल २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष तथा माजी विधानसभा सदस्य सिराजोद्दीन देशमुख यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेच्या अध्यक्षांनी प्रथम ध्वजारोहण केले. त्यानंतर घेण्यात आलेल्या कार्यक्रमात काझी मुजीबुर रहेमान यांची उत्कृष्ट कामगिरी आणि उत्कृष्ट शैक्षणिक सेवांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक इनामदार रजीयोद्दीन होते. याप्रसंगी संस्थेचे संचालक परवेझ युसुफजई, सफदर अली एज्युकेशन ट्रस्टचे सचिव सुजात अली देशमुख, शहर काझी मौलाना जफर मोहियोद्दीन, सामाजिक कार्यकर्ते सय्यद मुजीब, ए.के.ए. वन, हाजी मोहसीन पटेल, मॉडेल स्कूलचे संचालक नासिर खान पठाण, अब्दुल हादी कादरी, इनामदार आमिर सर, जावेद सर, मौलाना हाफिज सफदर, नॅशनल उर्दू हायस्कूलचे प्रभारी नईम देशमुख, बिलाल देशमुख, बासित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संस्था अध्यक्षांकडून करण्यात आलेल्या सत्काराबद्दल सहशिक्षक काझी मुजीबुर रहेमान यांनी मुख्याध्यापक इनामदार रजीयोद्दीन यांचे आभार मानले.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत