Breaking News

बलभीम महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तीस वर्षानंतर साजरा केला गेट-टुगेदर सोहळा


 बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील नामांकित बलभीम महाविद्यालयात सन १९९०-९५ पर्यंत शिक्षण घेतलेले वाणिज्य शाखेचे विद्यार्थी- विद्यार्थिनींनी तीस वर्षानंतर औरंगाबाद येथे एकत्रित येऊन स्नेह मिलन (गेट-टुगेदर) कार्यक्रम देवगिरी हुरडा पार्टी येथे साजरा केला.

शालेय मित्र-मैत्रिणींचा स्नेह मिलन कार्यक्रम आपण नेहमी पहातो किंवा वाचत असतो परंतु महाविद्यालयीन मित्र आणि मैत्रिणींचे गेट-टुगेदर फार कमी होतात. महाविद्यालयीन विद्यार्थी अवघे दोन-पाच वर्ष जरी सोबत राहत असले तरी मैत्रीची नाळ कायम जपणारे मित्र आणि मैत्रिणी आयुष्यभरासाठी मैत्रीचे ऋणानुबंध जपतात, म्हणूनच हा स्नेहमीलन आदर्श आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मित्रवर्य स्वर्गवासी रवी दोडके, सुनील चोरडिया, सुचिता कागवटे आणि गुरुवर्य राजहंस सर यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सायली भालेराव यांनी करताना प्रत्येक मित्र आणि मैत्रिणींना मनमोकळे प्रश्न विचारून बोलते केले. यामुळे प्रत्येकाने आजपर्यंतचा प्रवास दिलखुलासपणे मांडला. प्रभावी सूत्रसंचलनामुळे प्रत्येक मित्र-मैत्रिणींचा कंठ दाटून आला. आजपर्यंतच्या आयुष्यात आलेले चढ-उतार सर्व वर्ग मित्रांनी व्यक्त केले. वर्गमित्र ॲड. शफिक भाऊ, मुकेश देशमुख, बाळासाहेब शेंडकुडे, राधेश्याम कासट, मंगेश कुलकर्णी, फारुख शेख, मंजुषा देशपांडे, अनिता मोहेकर, सीमा महाजन, सायली भालेराव, मनीषा कपाले आणि अनंत सुतनासे यांनी जुन्या आठवणीना उजाळा दिला. तीस वर्षानंतर केलेला हा गेट-टुगेदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बलभीम ऋणानुबंध या व्हाट्सअप ग्रुपचे ॲडमिन अनंत सुतनासे आणि मनीषा कपाले यांनी विशेष परिश्रम घेतले.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत