कोण म्हणतोय संविधान बदललं जावू शकतं? बीड जिल्हा वकील संघाकडून संविधान दिन साजरा
(एस.एम.न्युज़) - दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी बीड जिल्हा वकील संघाकडून संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस संविधान रचयिते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून संविधानाची (प्रियांबल) प्रस्तावना वाचून सुरुवात करण्यात आली. बीड जिल्हा वकील संघाने प्रमुख जिल्हा व सञ न्यायाधीश, बीड आनंद यावलकर आणि सर्व न्यायाधीश मंडळींच्या उपस्थितीत बीड जिल्हा वकील संघामार्फत संविधान दिनाचे औचित्य साधून सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला अभिवादन करून व संविधानाच्या प्रस्तावनेस वंदन करून संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष व कार्यकारिणी, वकील सदस्यांचे उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे प्रमुख जिल्हा न्यायाधीश यावलकर यांचा बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष आर.डी.येवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा न्यायाधीश पाटील मॅडम यांचा सत्कार सचिव यासीर पटेल यांनी केला तर प्रमुख वक्ते ॲड. पंडित यांचा सत्कार उपाध्यक्ष अविनाश गडगे यांनी केला. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष येवले यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते ॲड.के.एस. पंडित यांनी विस्तृतपणे भारतीय संविधान व इतर देशांचे संविधान यातील फरक अधोरेखित करून केवळ भारतीय संविधानामुळेच आज आपला विविधतेने नटलेला देश हा कसा टिकून आहे, असे इतर देशांचे उदाहरण देऊन स्पष्ट केले. तसेच वेगवेगळ्या जागतिक दर्जाच्या विचारवंत लेखकांनी भारतीय संविधानाची केलेली प्रशंसा देखील वर्णित केली. इतर अनेक देशांचे संविधान अनेक वेळा बदलले गेले असून भारतीय संविधान मात्र स्थापनेपासून आजपर्यंत बदलण्याची गरज पडलेली नाही, असे देखील कारणासहित सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीड जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष नितीन वाघमारे यांनी केले तर बीड वकील संघामार्फत सहसचिव ॲड. श्रीकांत जाधव यांनी आभार प्रदर्शन केले. तसेच २६/११ ला झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध व्यक्त करून सर्व हुतात्म्यांना दोन मिनिट शांत उभा राहून या कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यात आली. अशाप्रकारे बीड जिल्हा वकील संघाकडून संविधान दिन साजरा करण्यात आला.
==================================
*आमच्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*- एस.एम.युसूफ़*(मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा