सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण केल्याबद्दल एस.एम.युसूफ़ यांचा यादे रफी कार्यक्रमात सत्कार
बीड (एस.एम.न्युज) - नुकतेच २९ जुलै २०२४ रोजी बीड शहरातील जुने एस.पी. ऑफिस आणि जिल्हा रुग्णालय रस्त्यावर चला थोडंसं वाचूया व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून वृक्षारोपण केल्याबद्दल ग्रुप ॲडमिन तथा एस.एम.न्युज चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ यांचा एक शाम मोहम्मद रफी साहब के नाम यादे रफी या गीत संगीताच्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
चला थोडंसं वाचूया व्हाट्सअप ग्रुप कडून वर्गणी गोळा करून जुने एस.पी. ऑफिस रस्ता आणि जिल्हा रुग्णालय रस्त्यावर १५ झाडे लावण्यात आली. ग्रुप कडून करण्यात आलेले हे कार्य समाजोपयोगी तसेच पर्यावरणाला हातभार लावणारे असल्याने वृक्षारोपणासाठी पुढाकार घेऊन कार्य केल्याबद्दल चित्रपट जगतातील पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे ३१ जुलै २०२४ रोजी घेण्यात आलेल्या एक शाम मोहम्मद रफी साहब के नाम यादे रफी या गीत संगीताच्या कार्यक्रमात ग्रुप ॲडमिन तथा एस.एम.न्युज चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ यांचा कार्यक्रमाचे आयोजक तथा गायक एम.एम. शेख यांनी हृदयी सत्कार केला. यावेळी गायक तथा निवेदक आकाश जाधव, शेख मज़हरुद्दीन, शेख मुजीब, जनार्धन वडमारे, संध्या जाधव, अस्मिता आहिरे, निशा उजगरे, आशा भारती, ससाने मॅडम, कृष्णा पांगरे या गायक गायिकांसह शेकडो गीत संगीत श्रोत्यांची उपस्थिती होती.
============================
*"आता एकाच ठिकाणी सर्व सेवा"*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) कार्यक्रम स्थळी येऊन *बातमी* लिहून मिळेल.
संपर्क -
*एस.एम.युसूफ़*
रमेशराव गंगाधरे यांची स्वस्त धान्य दुकान क्रमांक ४१, राजुरीवेस जवळ, भीमराज नगर, बीड.
संपर्क क्रमांक - *9021 02 3121*
*वेळ - दुपारी ५ ते रात्री ९ पर्यंत*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा